विश्वविख्यात पद्मश्री कैलास खेर यांच्या गायनाने प्रेक्षक भारावून गेले, महोत्सवात गर्दीचा उच्चांक

 0
विश्वविख्यात पद्मश्री कैलास खेर यांच्या गायनाने प्रेक्षक भारावून गेले, महोत्सवात गर्दीचा उच्चांक

विश्व विख्यात कैलाश खेर यांच्या गायनाने प्रेक्षक भारावले

औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात दुसऱ्या दिवशी विश्व विख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर यांचे आगमन होताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या आणि हात उंचावून जोरदार स्वागत केले. त्यांनी "तौबा तौबा वे तेरी सुरत.."हे गीत गायनाला सुरुवात केल्यावर संपूर्ण वातावरण भारावून शांत झाले होते. 

यावेळी पद्मश्री कैलास खेर प्रेक्षकांशी संवाद साधतांना म्हणाले की, आज तुम्ही सगळे प्रेक्षक परमात्माचे अंश होऊन माझ्यासमोर बसले आहात. आजचा हा क्षण तुम्ही निश्चितच आयुष्यभरासाठी लक्षात राहील. हा ऐतिहासिक क्षण असल्याचे रसिकांना वाटत होते. गीत गायनात कलेचा आविष्कार शहरवासीयांनी अनुभवला. 

आतापर्यंत पद्मश्री कैलास खेर यांनी "तौबा तौबा वे तेरी सुरत" "आओजी....", "मैं तो तेरे प्यार में दिवाना..", कौन है वह कौन है"तू जाने ना..", "कैसे बताएं क्यू तुझको चाहे..." "पिया के रंग, रंग दी नी ओढ़नी..", तेरे बिन नहीं लगता..." "तेरे नाम से जी लूं.." , आदी गाणे गायली. 

यावेळी पद्मश्री कैलास खेर यांचा सन्मान राधावल्लभ धुत, समिती अध्यक्ष तथा मनपा आयुक्त जी. श्रीकांत, लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते पुस्तक आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. 

आज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महोत्सवाचे सह अध्यक्ष जी श्रीकांत, लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे, मोक्षदा पाटील (आयपीएस), अंजली कराड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, महोत्सवाचे समन्वयक अनिल इरावने, सारंग टाकळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले.  

अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक- सोनेरी महल येथे आयोजित वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात दुसऱ्या दिवशी प्रख्यात गायक कैलाश खेर यांना ऐकण्यासाठी गर्दीचा उच्चांक प्रस्थापित झाला. सोनेरी महल बाहेर लावलेल्या स्क्रिनसह ऑनलाईन देखील रसिक प्रेक्षकांनी महोत्सवाचा आस्वा

द घेतला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow