वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यावेतन देऊन शंभर टक्के सवलत द्या- राजेंद्र दाते पाटील
मुख्यमंत्री यांचें कडे मागणी
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणा साठी सुद्धा विद्यावेतन देउन शंभर टक्के सवलत द्या- अभ्यासक राजेंद्र दाते पाटील
मुंबई,दि.30(डि-24 न्यूज) वैद्यकीय क्षेत्रा मध्ये बीएएमएस पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी अशासकीय ( खाजगी ) महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी सुद्धा विद्यावेतन ( स्टायफंड) लागू करून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मुलीसाठी सुद्धा शंभर टक्के मोफत योजना सुरू करणे बाबत तात्काळ आदेश जारी करावे अशी मागणी जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी निवेदन देऊन मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
आपल्या सविस्तर निवेदनात जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी नमुद केले की, शासकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना 80,000 रुपये विद्यावेतन दिले जाते परंतु अशासकीय ( खाजगी) महाविद्यालयात असेलल्या प्रवेशिताना काही एक विद्यावेतन दिले जात नाही. शासनाच्या सक्षम प्राधिकरणात राबिवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया(सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप) मार्फतच विद्या वेतन प्राप्त न होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अशासकीय महाविद्यालयात प्रवेश होतात, मग हा दुजा भाव का ? अशा स्थितीत प्रवेशित यांचेवर मोठा अन्याय होत आहे.
म्हणून वैद्यकीय क्षेत्रा मध्ये बीएएमएस पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी अशासकीय ( खाजगी ) महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनी सुद्धा विद्यावेतन ( स्टायफंड) मिळणे आणि
पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मुली साठी सुद्धा शंभर टक्के मोफत योजना सुरू करणे बाबतचा आदेश तात्काळ जारी व्हावा अशी विनंती करण्यात आली आहे.
What's Your Reaction?