शहरभर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष... जयंती उत्साहात साजरी

जयघोषात शिवजयंतीचा शहरभर उत्साह...
तरुणाईचा क्रांतीचौकात जल्लोष, वाहन रॅलीने लक्ष वेधले
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. जय भवानी.. जय शिवाजीच्या जयघोषात शिवजयंतीचा उत्साह शहरभर दिसून येत होता. शहरातील क्रांतीचौक परिसरात मध्यरात्री बारा वाजेच्या ठोक्याला जोरदार आतिषबाजी करुन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तरुणाईने एकच जल्लोष केला होता. आज सकाळपासूनच तरुणाईचे जत्थेच्या जत्थे हातात भगवे ध्वज घेवून जय भवानी.. जय शिवाजीचा जयघोष करत दाखल होत होते. शिवजयंतीनिमित्ताने शहराच्या विविध भागात दुचाकी वाहन रॅली काढण्यात आली होती.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत क्रांतीचौक परिसरात सकाळी 8.30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राज्याचे दुग्धविकासमंत्री अतुल सावे, खा. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. विक्रम काळे. आ. सतीश चव्हाण, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष अभिजीत देशमुख, राजू शिंदे, प्रा.चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, राजेंद्र दाते पाटील, कृष्णा बनकर, नागराज गायकवाड, अभिषेक देशमुख, लक्ष्मीनारायण बाखरीया, हर्षदा शिरसाट, मकरंद कुलकर्णी, प्रभाकर मते, विजय वानखेडे, अरविंद जाधव, रामदास जाधव, मिथुन व्यास, हरीश शिंदे, अभिजित थोरात, सचिन अंभोरे आदींची यावेळी उपस्थिती होती. जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष खा. डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इब्राहीम पठाण, महेंद्र रमंडवाल, डॉ. पवन डोंगरे, काँग्रेसच्या महिला शहर जिल्हाध्यक्ष दिपाली मिसाळ, लहु शेवाळे आदींची यावेळी उपस्थिती होती. काँग्रेस सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आदी विविध पक्ष संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात
आले.
What's Your Reaction?






