शहरात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन
 
                                मंत्री अतुल सावेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न..
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्व विधानसभा मतदार संघातील वार्ड क्रमांक 32 आंबेडकर नगर, अंतर्गत गजानन कॉलनी मधील 70 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा शुक्रवारी ( 22 डिसेंबर) रोजी संपन्न झाले असून नागरिकांशी संवाद साधला. हा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, फुलेनगर याठिकाणी पार पडला.
यावेळी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या आमदार निधी च्या माध्यमातून मनपा हद्दीतील वार्ड क्रमांक 32 आंबेडकर नगर येथील बुद्ध विहार सुभोभिकरण या सह पाच रत्यांचे समावेश असून त्यांचा भूमिपूजन सोहळा आज शुक्रवार रोजी पार पडला.
यात वॉर्ड क्र.32 आंबेडकरनगर अंतर्गत फुलेनगर येथील श्री. कुंदन वासनेकर ते श्री. संजू रोकडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे. फुलेनगर येथील श्री. भालेराव यांच्या घरापासून ते श्री. रमा दांडगे यांच्या घरापर्यन्त रस्त्याचे सीमेंट काँक्रिटीकरण करणे. श्री. चक्रधर मगरे यांच्या घरापासून ते श्री.गफूर शहा यांच्या घरापर्यन्त रस्त्याचे सीमेंट काँक्रिटीकरण करणे. गौतमनगर येथील श्री. साईनाथ गायकवाड यांच्या घरापासून ते श्री. राठोड यांच्या घरापर्यन्त रस्त्याचे सीमेंट काँक्रिटीकरण करणे. गौतमनगर येथील नागार्जुन बौद्ध विहाराचे सुशोभीकरण करणे. अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलतांना श्री मंत्री अतुल सावे म्हणाले की, येणाऱ्या काळात येथील नागरिकांच्या सर्व अडचणी या दूर केल्या जातील. हे सर्व सामान्य जनतेचे सरकार असून नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रामुख्याने लक्ष देऊन विकासाची काम जलद गतीने केली जात आहेत. आगामी शहरातील पाणी प्रश्न सोडवणार असून पाण्याची पाईप लाईन टाकली जाणार आहे. त्यासोबतच आंबेडकर नगर मधील पाणी, ट्रेनेज सारखे विषय लवकर मार्गी लावणार. त्यासाठी विशेष निधी किंवा आमदार निधीच्या माध्यमातून येथील समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मंत्री श्री अतुल सावे यांनी केले.
यावेळी अरुण पालवे, ताराचंद गायकवाड, नितीन खरात, गौतम खरात, मच्छिंद्र कांबळे, राहुल साबळे, अनिल दाभाडे, संजय जाईबहार, रामेश्वर दसपुते, सविता घोडतुरे, हर्षल चिंचोलकर यांच्या सह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            