शहरात विविध ठिकाणी महास्वच्छता अभियानाला नागरीकांचा प्रतिसाद...!

 0
शहरात विविध ठिकाणी महास्वच्छता अभियानाला नागरीकांचा प्रतिसाद...!

शहरात विविध ठिकाणी महास्वच्छता अभियानाला नागरीकांचा प्रतिसाद...

विमानतळ परिसरात स्वच्छता मोहिम

छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) महानगरपालिकेने दि.01 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान स्वच्छता महाअभियान राबविले जात आहे. या महाअभियानाला प्रतिसाद देण्यासाठी आज विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेतला. 

 विमानतळ संचालक श्री.शरद येवले यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलातील जवान यांच्या सहकार्याने विमानतळ परिसराची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा उपायुक्त रविंद्र जोगदंड, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी, रविंद्र घडामोडे विमानतळ प्राधिकरणाचे विनायक कटके, अर्चना बिंदु CISF चे कमांडर श्री.पवनकुमार, स्मार्ट सिटीच्या अर्पिता शरद, विशाल खरात, चेतन वाघ, किरण जाधव इ.उपस्थित होते. महापालिकेच्या घनकचरा विभागातील स्वच्छता कर्मचारी, विमानतळ प्राधिकरणातील कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

जमात-ए-इस्लामी हिंद तर्फे स्वच्छता महाअभियान

 जमात-ए-इस्लामी हिंद या संस्थेने महापालिका राबवित असलेल्या स्वच्छता महाअभियान सहभाग नोंदविता बायजीपुरा भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता स्वच्छता रॅली काढण्यात आली. तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया प्रमाणावर या अभियानात सहभागी झाले होते. या प्रसंगी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त रविंद्र जोगदंड, उपमुख्य स्वच्छता अधिकारी मुकुंद कुलकर्णी, रविंद्र घडामोडे, विशाल खरात, चेतन वाघ, किरण जाधव , अफरोज अहमद शेख (अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद) आदिल मदनी, शेख जमीर, शेख युनुस, खालेद उमर, मुख्याध्यापिका रईसा बेगम इ. यांची उपस्थिती होती.

स्वच्छता महाअभियान

नवखंडा महीला महाविद्यालयाच्या वतीने महापालिका राबवित असलेल्या स्वच्छता महाअभियानात सहभाग घेत भडकलगेट भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली. तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या अभियानात सहभागी झाले.

संपूर्ण कार्यक्रमाला घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड, सहायक आयुक्त दिपक भराट, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे रविंद्र घडामोडे, विशाल खरात, अर्पिता शरद, किरण जाधव, चेतन वाघ, प्राचार्य डॉ मगदूम फारुकी, उपप्राचार्य डॉ.वाद्या प्रधान, डॉ.मेघा राॅय यांची उपस्थिती होती.

BSGM स्कुलतर्फे एन-4 सिडको येथे नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वच्छता रॅली काढण्यात आली. तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली. शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर या अभियानात सहभागी झाले. याप्रसंगी महापालिकेचे विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त रवींद्र जोगदंड, स्वच्छता निरीक्षक रितेश माणिक सौदे, कृष्णा विसपुते, विकास भाले, स्वच्छता जवान शंकर रोकडे, रावसाहेब पवार, यश गुरसहाणी कर्मचारी विश्वस्त किरण सागर, प्रविण कुलकर्णी, सचिन खरात, अभय ॠषीपाठक, मेहरीन मह्यार, स्वाती कुलकर्णी, सुजाता दाणी, सुरेश आनंदराव व शाळेची

टिम उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow