शहरात होणार उलमा बोर्डाची राज्यस्तरीय परिषद, बैठकीत निर्णय...!
ऑल इंडिया उलमा बोर्डाची विशेष बैठक संपन्न... शहरात होणार भव्य राज्यस्तरीय परिषद... राष्ट्रीय स्तराचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- ऑल इंडिया उलमा बोर्ड मूतवल्ली विंग आणि शिक्षण विंगचे महाराष्ट्र स्तरावर कार्यक्रम आयोजित शहरात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
ही बैठक मूतवल्ली विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख फैसल इकबाल मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीचे नियोजन शिक्षण विंग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नबी वजीर पटेल यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली.
बैठकीत शिक्षण विंगचे महाराष्ट्र अध्यक्ष नबी पटेल आणि दैनिक भूमिसत्ताचे संपादक प्रकाश भग्नुरे पाटील यांनी फैसल मुजावर यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.
बैठकीत मार्गदर्शन करताना फैसल मुजावर यांनी सांगितले शहरात उल्मा बोर्डचे महाराष्ट्र स्तरावर शहरात भव्य परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात संपूर्ण भारतातून उल्मा बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना नौशाद सिद्दीकी, राष्ट्रीय महासचिव अल्लामा बुनई हसनी, राष्ट्रीय प्रवक्तता बादशहा खान, राष्ट्रीय पत्रकार परिषदचे सदस्य महताब खान (उत्तराखंड) , यांच्या सह, सर्व समाजातील धर्मगुरु, सूफी संत मुतवल्ली, मुजावर, खादिम, पीरजादे, सज्जादा नशीन, आणि मस्जिदचे ट्रस्टी, यांच्या सोबत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, एडवोकेट आणि विविध क्षेत्रतील मान्यवर औरंगाबाद , जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड ,वाशिम, बुलढाणा, वर्धा, नागपूर, अहमदनगर ,पुणे, मुंबई, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर असे संपूर्ण महाराष्ट्रातील उल्मा बोर्ड पदाधिकारी यांची आणि प्रतिष्ठित मान्यवरांची या वेळी उपस्थिती राहणार आहे.
शहर आणि मराठवाड्याचे सर्व सेलचे पदाधिकारी यांनी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पार पाडण्यासाठी परिश्रम करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी उल्मा बोर्ड मूतवल्ली विंगचे शहर अध्यक्ष उस्मान हबीब खान, महिला अध्यक्षा सीमा मांडवीया ,उपाध्यक्ष अहमद अली खान, मूतवल्ली हरी मस्जिद दर्गा फहीमोद्दीन शुतारी, रहीम खान, अजीज शेख, बाबा लीडर, खालेद पठाण, स्मिता येरूंनवार, अनुराधा पानसरे, याच्या सह शिक्षण विंगचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जावेद सर, इस्माईल पटेल, मोठ्या संख्येने पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?