शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे - सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख

 0
शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे - सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख

औरंगाबाद युवाच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त गौरव समारंभ उत्साहात संपन्न...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज)- साप्ताहिक “औरंगाबाद युवा” व “युवाशक्ती पत्रकार संघ” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 20 व्या वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाजसेवा, आरोग्य, पत्रकारिता, साहित्य, राजकारण, बांधकाम व अन्य विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा “सन्मान चिन्ह” देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी आपल्या भाषणात औरंगाबाद युवाला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी शहर पोलिसांची कारवाई सुरू आहे. शहर नशा मुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डिजिटलच्या युगात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होऊन सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे त्यापासून त्यांना वाचवण्यासाठी जनजागृती करावी असेही आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इब्राहीम पठाण यांनी औरंगाबाद युवाचा खडतर प्रवास कसा झाला याबद्दल माहिती दिली. वृत्तपत्रांची ताकत काय आहे याचे उदाहरण त्यांनी दिले. आपल्या लेखनीतून संपादक अब्दुल कय्यूम यांनी गरीब व वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असतात म्हणून वाचक व जाहिरातदार यांनी वृत्तपत्राला पाठबळ देण्याचे आवाहन केले.

या सोहळ्यात उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी “औरंगाबाद युवा” या वृत्तपत्राच्या दोन दशकांच्या प्रवासाचे कौतुक करताना सांगितले की, आजच्या डिजिटल युगातही प्रामाणिक वृत्तपत्रकारिता जपणं ही मोठी जबाबदारी असून, संपादक अब्दुल कय्यूम यांनी ती यशस्वीरित्या निभावली आहे.

गौरवचिन्ह प्राप्त मान्यवरांमध्ये मा. सय्यद करीम मुनीर, बाबा बिल्डर्स, अजहर कलीम मिर्झा, अब्दुल अझीम अब्दुल समद वसईकर, मोहम्मद अफजल बेग, अब्दुल अजीज (नांदेड), मोहम्मद फजल शेख, हकीम शेख जावेद शेख शब्बीर, शगुफ्ता साबेर खान पठाण, साबेर खान सिराज खान पठाण, मोहम्मद तारेक मेहमूद (बुलढाणा), डॉ. सलीम उस्मान खान पठाण (ता. गंगापूर), शेख आजम शेख मेहमूद, शेख लाला शेख रहेमान, शेख अमजद शकील अहमद, सय्यद अशफाक अली, हकीम मिर्झा फरीद जानी वेग, डॉ. शेख रईसोद्दीन (बीड), हबीब इब्राहिम शेख, सय्यद वलीउल्लाह हुसेनी, डॉ. सोहेल खान, डॉ. शेख शकील जलाल, मुस्तफा चाचा, रामेश्वर शिवाजी दरेकर, अथर सलीम सिल्लोडी, असलम खान पठाण, सय्यद जाकिर, हकीम रिझवान इकबाल शेख आणि डॉ. शेख आमेर अब्दुल खदीर (बीड) यांचा समावेश होता.

या सर्व मान्यवरांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “सन्मान चिन्ह” देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, समाजसेवक, साहित्यिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इब्राहीम पठाण, सय्यद साबेर, इंजी. के. एम. आय. सय्यद, सलीम चिश्ती, बाबा बिल्डर्स, अझीम वसईकर, हाजी याकूब, हफीज अली, शेख मुकरम, सय्यद लायकोद्दीन, मोहम्मद झाकेर, डॉ. शकील शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन संपादक अब्दुल कय्यूम आणि “युवाशक्ती पत्रकार संघ” परिवाराने केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख मुख्तार यांनी केले तर सय्यद शेख मुकर्रम यांनी आभार प्रदर्शन केले.

या सोहळ्याने “औरंगाबाद युवा” च्या 20 वर्षांच्या यशस्वी प्रवासाला एक नवा उंचीचा टप्पा गाठून दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow