शहर प्लास्टिक मुक्त करणार, 1800 किलो प्रतिबंधित प्लास्टिकचे वाहन मनपाने केले जप्त...

 0
शहर प्लास्टिक मुक्त करणार, 1800 किलो प्रतिबंधित प्लास्टिकचे वाहन मनपाने केले जप्त...

शहराला प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी प्रतिबंधित प्लॅस्टिक वापर व साठा करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा- प्रशासक जी श्रीकांत 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) - शहराला प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी असलेली दुकाने , ट्रान्सपोर्ट व इतर ठिकाणी प्रतिबंधित प्लॅस्टिक वापर व साठा करणाऱ्या व्यक्तींना शोधून मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले.

दिनांक 13 सप्टेंबर रोजी बाबा पेट्रोल पंप येथे प्रशासक यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त तथा घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथकाने 1800 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक व वाहतूक करणारे वाहन जप्त करून मनपा मुख्यालय येथे जमा केले होते.

 आज मनपा मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व उप आयुक्त नंदकिशोर भोंबे यांनी सदर मालाची पाहणी करून संबंधित व्यापारी व वाहन चालक यांच्यावर दंडात्मक कारवाई व यांचे वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

   या नुसार संबंधित यांचे कडून प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरणे ,साठा करणे व त्याची अवैध वाहतूक करणे याबाबत रु.25000/ दंड वसूल करण्यात येऊन क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 यावेळी आयुक्त महोदय यांनी शहरातील विविध ठिकाणी असलेली दुकाने,गोदाम, ट्रान्सपोर्ट व इतर ठिकाणे शोधून यावर प्रतिबंध करण्यासाठी संबंधितांवर प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरणे,अवैध साठा करणे ,वाहतूक करणे याबाबत गुन्हे दाखल करण्याचे आदेश नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांना दिले.

यावेळी उप आयुक्त तथा घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे,नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow