शहर विकास आराखड्यावर आलेल्या साडेआठ हजार आक्षेपाचे काय झाले, विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह

 0
शहर विकास आराखड्यावर आलेल्या साडेआठ हजार आक्षेपाचे काय झाले, विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह

शहर विकास आराखड्यावर आलेल्या साडेआठ हजार आक्षेपाचे काय झाले, विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) नविन शहर विकास आराखडा मनपा प्रशासनाने जाहीर केले. परंतु अगोदरच्या आराखड्यावर 8500 आक्षेप आले होते त्याचे काय झाले. नवीन विकास आराखड्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलनाचा इशारा पत्रकार परिषदेत भिमशक्ती व मुस्लिम अवामी कमेटीने दिला आहे. माजी नगरसेवक नासेर नाहदी चाऊस, माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी यावेळी सांगितले शहर गेल्या 30 वर्षांपासून विकास आराखड्याची प्रतिक्षा करत आहे तो बनवत असताना जवाबदारीने व काळजीपूर्वक बनवला जावा हे अपेक्षित होते. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना याबाबत सर्व स्तरातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या व त्याचा अभ्यास केला असता अनेक गंभीर चुका त्यात दिसून आले.

सदरील विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरील 8500 नागरीकांनी आक्षेप अर्ज दाखल केले होते. त्यातील निदर्शनास आलेल्या चुकांच्या बाबत इत्यंभूत माहिती घेतली असता नकाशा तयार करतेवेळी अनेक गंभीर चुका झाल्याचे निदर्शनास येते. त्यातून निर्माण होत असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे नगर विकास विभाग व नियुक्त अधिकारी, डी.पी.युनिट, आयुक्त यांच्याकडून अपेक्षित आहे. 

विकास आराखडा तयार करत असताना भुमी अभिलेख कार्यालयामार्फत पायाभूत नकाशा(Base Map) प्रमाणित करून घेतला आहे व तो पायाभूत नकाशा विकास आराखड्याशी मॅच होतो का...? असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारला.

शासनाला मंजूरीसाठी पाठवलेल्या आराखड्यात Base Map दुरुस्त केला असा निर्वाळा नियुक्त अधिकारी देतात परंतु तसे मुळीच दिसले नाही. हे जनहिताच्या विरुद्ध आहे. या बदलांमध्ये काही ठिकाणी रस्त्याच्या आखणी बदलून त्या स्थलांतरित केल्या आहेत. बदललेले रस्ते हे मंजूर रेखांकनातील भुखंडावरुन जात आहेत. हि बाब गंभीर आहे त्यामुळे असे बदल करणे हे जनहिताच्या विरुद्ध असून ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वात बसत नाही. असे बदल रद्द ठरविण्यात यावे. अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

नियुक्त अधिकारी यांनी कलम 28(4) च्या प्रसिद्ध केलेल्या नकाशात जे बदल केले त्यात काही ठिकाणी नवीन रस्ते व नवीन आरक्षणे प्रस्तावित केली आहे. जी की कलम 26 च्या प्रसिद्ध केलेल्या प्रारुप विकास आराखड्यात नव्हती. अशा नव्याने प्रस्तावित आरक्षणाच्या बाबत नागरीकास आक्षेप घेण्याची संधी प्राप्त झाली नसल्यामुळे हि बाब नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध असून अशी नवीन प्रस्तावित आरक्षणे रद्द ठरवण्याची विनंती त्यांनी केली आहे. 

शहर आराखड्यामध्ये रेखांकन करताना कोणाच्या धार्मिक स्थळांची जसे मंदिर, मस्जिद, बुध्द विहार, चर्च, कब्रस्तान, दर्गाचा विचार करण्यात आलेला नाही. प्रतापनगर येथील मंजूर आराखड्यात 3 स्मशानभुमी होत्या त्यातील दोन स्मशानभूमी रद्द करुन रहीवाशी क्षेत्र केल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक तथा महानगरप्रमुख भिमशक्ती, मिलिंद दाभाडे, महाराष्ट्र अवामी कमेटीचे प्रमुख इलियास किरमानी, माजी नगरसेवक नासेर नाहदी चाऊस, भिमशक्तीचे मराठवाडा अध्यक्ष संतोष भिंगारे, माजी नगरसेवक अब्दुल रऊफ, भिमशक्तीचे शहराध्यक्ष सतीश नरवडे यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow