शिवजयंतीच्या निमित्ताने मनपा आयुक्त जी श्रीकांत व पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांची लेझिम

 0
शिवजयंतीच्या निमित्ताने मनपा आयुक्त जी श्रीकांत व पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांची लेझिम

शिवजयंतीच्या निमित्ताने मनपा आयुक्त जी श्रीकांत व पोलीस उपायुक्त यांची लेझिम...!

औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) महानगरपालिका तर्फे आज दि 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली.

यानिमित्त आज सकाळी 9 वाजता मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास 

हायड्रोलिक क्रेनच्या साहाय्याने पुष्पहार टाकून अभिवादन केले. यावेळी मनपा प्रियदर्शनी शाळा आणि मा जिजाऊ शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत प्रशासक यांनी लेझीमचा आनंद घेतला. यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनीही लेझिम खेळली.

तद्नंतर मनपा इमारत टप्पा क्रमांक 03, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुरानवस्तू संग्रहालय आणि सिडको एन-7 येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रशासकांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्या हस्ते पुतळा परिसराचे नूतनीकरणचे कामाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, शहर अभियंता ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता बी डी फड, के एम फालक, आर एन संधा, अमोल कुलकर्णी, फारुख खान, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा, उप आयुक्त नंदा गायकवाड, सोमनाथ जाधव, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी अहमद तौसीफ, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, गिरी, सविता सोनोवणे, सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू आदींची उपस्थिती होती.

350 विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाची छत्रपती शिवरायांना मानवंदना...

‘महासंस्कृती’ महोत्सवाचा प्रारंभ; दि.22 ते 25 सांस्कृतिक कार्यक्रम

औरंगाबाद, दि.19 (डि-24 न्यूज) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे होत असल्याचे औचित्य साधून 350 विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त मानवंदना दिली. लेझीम पथकाच्या तालबद्ध सादरीकरणाने क्रांती चौक येथील वातावरण भारावून गेले. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित ‘महासंस्कृती’ या महोत्सवास औपचारिक प्रारंभही येथूनच करण्यात आला. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त क्रांती चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास समोर 350 विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने लेझीम नृत्य सादर करुन महाराजांना मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. 

महानगर पालीका आयुक्त जी. श्रीकांत, अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, उपविभागीय अधिकारी राठोड, तहसिलदार रमेश मुंडलोड, जिल्हा क्रीडा अधिकारी देसाई यांच्यासह शालेय विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लेझीम पथकाच्या तालबद्ध कवायतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मनपा आयुक्त जी श्रीकांत, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, नितीन बगाटे यांनी लेझीम पथकात सहभागी होवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. 

महासंस्कृती, महानाट्य महोत्सव; दि.22 ते 25 सांस्कृतिक कार्यक्रम

शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महासंस्कृती व महानाट्य या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. दि.22 ते 25 पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम यानिमित्ताने शहर वासियांना पाहता येणार आहेत. या आयोजनात पारंपारिक कलांचे सादरीकरण, स्थानिक कलाकारांना वाव, शिवकालिन खेळ, महिलांचे पारंपारिक खेळ अशा विविध बाबींचा अंतर्भाव करण्यात आला असून आज क्रांती चौकात 350 विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य सादर करुन महासंस्कृती महोत्सवाचा प्रारंभ झाला. गुरुवार दि.22 ते रविवार दि.25 असे सलग चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांची रुपरेषा याप्रमाणे- 

गुरुवार दि.22 रोजी शिवछत्रपती वस्तू संग्रहालयास शालेय विद्यार्थ्यांची भेट. सायं.6 वा. आदर्श शिंदे यांचा संगित रजनी कार्यक्रम, स्थळ-मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर.

शुक्रवार दि.23 रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्य रांगोळी- स्थळ- सिद्धार्थ उद्यान. सकाळी 10 ते 12 विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन, दुपारी साडेबारा ते 2 वा. पर्यंत आलाप वाद्यवृंदासह टीव्ही कलावंतांचा ऑर्केस्ट्रॉ, दुपारी 3 वा. महिलांचे पारंपारिक खेळ,स्थळ- सिद्धार्थ उद्यान. सायं. 6 वा.अवधुत गुप्ते संगित रजनी, स्थळ- मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान खडकेश्वर,

शनिवार दि.24 रोजी सकाळी 10 ते 12 शिवकालीन क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन- स्थळ सिद्धार्थ उद्यान. सायं. 6 वा.नंदेश उमप संगित रजनी कार्यक्रम- स्थळ मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर.

रविवार दि.25 रोजी सायं 6 वा. ‘शिवबा’ महानाट्य सादरीकरण- स्थळ मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर.

या सोबतच दि.23 व 24 रोजी जिल्ह्यातील अभियांत्रिकी व औषध निर्मिती विभागाच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे प्रदर्शन सिद्धार्थ उद्यानात लावण्यात येणार असून ते ही नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. स्थानिक लोककलावंतांनाही दि.22 ते 25 दरम्यान दररोज मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान येथील मुख्य कार्यक्रमात सादरीकरणाची संधी दिली जाईल. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून सगळ्यांना प्रवेश मोफत आहे,असेही अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी स्पष्ट

केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow