शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पूर्व तयारी संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक
 
                                शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पूर्व तयारी संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दि. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्व तयारी संदर्भात मंगळवारी संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महा विकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात बैठक घेण्यात आली. या सभेला पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करावे. अशा सूचना करण्यात आल्या.
याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले,राज्य संघटक चेतन कांबळे,महानगरप्रमुख राजू वैद्य,उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह, राजेंद्र राठोड, रतन कुमार साबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम शहराध्यक्ष उमाकांत खोतकर, शहरप्रमुख हरीभाऊ हिवाळे, गिरजाराम हाळनोर, नितीन घोगरे, शहर संघटक सचिन तायडे,महिला आघाडी संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सह संपर्क संघटक सुनिता देव, अनिता मंत्री, जिल्हा संघटक आशा दातार, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री,शहर संघटक वैशाली आरट,अनिता भंडारी, शिला मगरे, सबिया शेख उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            