शिवसेनेचे मशाल चिन्ह विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाची नांदी ठरणार - अंबादास दानवे

 0
शिवसेनेचे मशाल चिन्ह विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाची नांदी ठरणार - अंबादास दानवे

शिवसेनेचे मशाल चिन्ह महाराष्ट्र द्वेषांना जाळून टाकणारे...

शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन...

भगव्या सप्ताहास झाली सुरुवात...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.4(डि-24 न्यूज ) शिवसेनेचे मशाल चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. महाराष्ट्र द्वेषांना ते जाळून टाकणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरातील तील त्रिमूर्ती चौक येथे रविवार ता. ४ ऑगस्ट रोजी आयोजित भगव्या सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी केले. शिवसेना विभागप्रमुख नंदू लबडे यांच्या वतीने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

१९९८ साली निवडून आलेले नगरसेवक अविनाश कुमावत यांचा शिवसेना पक्ष प्राथमिक सदस्य नोंदणीचा पहिला अर्ज भरून सप्ताहास सुरुवात करण्यात आली. अंबादास दानवे यांनी स्वतः पहिला अर्ज भरून कुमावत यांना शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाची नोंद केली. शिवसेना ही निरंतर चालणारी संघटना असून पश्चिम विधानसभा मतदारसंघात गद्दारी झाली असली तरीही नवीन जोमाचे शिलेदार पक्षात येत असल्याची खात्री दानवे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिली.

शिवसेनेच्या ताकदीवर निवडून येण्याचे आणि तिच्या विचाराशी गद्दारी करायची अशी येथील आमदाराची मनोवृत्ती झाली आहे. संपत्तीच्या बाळावर या मतदारसंघात ते दादागिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच निष्ठावंत शिवसैनिकांची फोडाफाडी करायचे काम यांनी हाती घेतले असून आगामी विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिक या गद्दाराला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची टिका अंबादास दानवे यांनी यावेळी नाव न घेत स्थानिक आमदारांवर केली.

या विधानसभा मतदारसंघातील गद्दार आमदारांना वाटत असेल आपण पक्ष सोडून गेलो म्हणजे शिवसेना संपली. परंतु शिवसेना संपणारी नसून सातत्याने वाढत जाणारी संघटना आहे. आगामी काळात आपल्याला शिवसेनाप्रमुखांचा भगवा विचार घेऊन जावे लागणार असल्याची सूचना दानवे यांनी यावेळी शिवसैनिकांना केली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण सर्व शिवसैनिकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. लोकसभेत ज्या प्रकारे आपण भाजपाला धडा शिकवलेला आहे. तसाच आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र जिंकून आपल्याला भाजपाला आपली ताकद दाखवून देण्याचे सांगितले आहे.

     भारतीय जनता पक्ष उसने बळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून लोकसभेला लोकांनी त्यांना पराभूत केले आहे. तशाच प्रकारे राज्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणून पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा ध्वज गाडायचा असल्याचा निर्धार यावेळी दानवे यांनी प्रकट केला.

येणाऱ्या काळात शिवसेनेची मशाल आपल्याला राज्यातील जनतेच्या मनामनात पेटवायची आहे. विभागप्रमुख, शाखाप्रमुख व गटप्रमुख यांनी घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करून घेतली पाहिजे. तसेच मशालीचे चिन्ह घरोघरी पोहचविले पाहिजे. आगामी तीन महिन्याचा काळ शिवसेनेसाठी अटीतटीच्या लढाईचा असून या लढाईत शिवसेना जिंकलीच पाहिजे असा ठाम निर्धार करा असे आवाहन अंबादास दानवे यांनी यावेळी केले.

याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे,चेतन कांबळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख राजू वैद्य, संतोष खेंडके,शहर प्रमुख विजय वाघचौरे, राजू शिंदे,शहरसंघटक सचिन तायडे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, संजय पवार, राजेंद्र दानवे, अभिजीत जिवनवाल, बापू कवळे, विभागप्रमुख सुरेश गायके,विनोद सोनावणे, अभिजीत अक्कीलवाड, उपविभाप्रमुख विनिष शामकुंवर, पंकज गुदडे, संतोष पडोल, सचिन जाधव, कैलास काथार, राजू राजपूत,शाखाप्रमुख विशाल राऊत, राहूल थोर, गोरख सोनवणे, अनित थोटे, सोमनाथ देवरे, देविदास पवार, विजय यादव, दीपक क्षीरसागर, जगदिश वेताळ, रामदास वाघमारे, कल्याण चक्रनारायण, माणिक जोहराले, कुणाल त्रिभुवन, योगेश साळवे, सुरेश हिवाळे, सुदर्शन मनपूरे, ऋत्विक आरट, प्रवीण कदम, राजेंद्र मंडलिक, मच्छिंद्र बनकर, सुरेश थोरमाटे,व्यापारी आघाडी रमेश रावळे, राजेंद्र मंडलिक, उत्तम कांबळे, सचिन देवकर, अक्षय जुग्धरे,महिला आघाडी सहसंपर्क संघटक सुनिता आऊलवार, सुनिता देव, अनुसयाताई शिंदे,उपजिल्हा संघटक अनिता मंत्री व शहर संघटक आशाताई दातार, राखी सुरडकर, अरुणा भाटी, सविता निंगोळे, संगीता पवार, वैशाली आरट, संध्या कोल्हे, उषा कावरे, सारिका शर्मा, नंदा पांढरे, अरुणा सदाफळ, स्वाती गणोरकर,युवासेना सोनू रंगमाळी, देविदास खरात, अभिजीत पवार व शेखर रावळे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow