श्री गणेश मुर्त्यांचे विसर्जनाची मनपाने केली तयारी

पांच फुटपर्यंतच्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन मनपा करणार, त्याचावरच्या उंचीचे गणेश मूर्त्यांचे विसर्जन संबंधित गणेश मंडळांनी आपल्या स्तरावर करावे, प्रशासक
गणेश विसर्जनाची जय्यत तयारी, मोठ्या संख्येत अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
छ.संभाजिनगर(औरंगाबाद), दि 16(डि-24 न्यूज); दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणेश उत्सव मोठ्या उत्साहात शहरात पार पाडण्यात येत आहे .या साठी महानगरपालिकेने खलील नमूद ठिकाणी गणपती विसर्जनाची सर्व सुविधा केली आहे.
विसर्जन विहीरी....
औरंगपुरा, हडको एन 12,
जालाननगर, संघर्षनगर,
मुकुंदवाडी, सातारा,पडेगाव,शिवाजीगर, देवळाई तलाव.
कृत्रिम तलाव...
कांचनवाडी,हर्सुल,
राजीव गांधी स्टेडियम,
शहानूरमिया दर्गा, चिकलठाणा, देशमुख नगर,
सातारा,
शसंकलन केंद्रांचे विसर्जन स्थळ देवळाई तलाव.
गणेश विसर्जन सुरळीतपणे पार पाडावे आणि नागरिकांना त्रास किंवा गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने मोठ्या संख्येत विहीर ,तलाव ,कृत्रिम तलाव या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी ,आरोग्य कर्मचारी पथक ,जीव रक्षक प्रणाली इत्यादींची व्यवस्था केली आहे. सदर ठिकाणी पाच फुटापर्यंतची मूर्ती नागरिकांना विसर्जित करता येणार आहेत. त्या पेक्षा अधिक उंचीची मूर्ती असल्यास त्या त्या गणेश मंडळाने त्यांच्या मंडळाच्या गणेश मूर्ती विसर्जनाची सोय आप आपल्या स्तरावर करावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक
महानगर पालिका जी श्रीकांत यांनी नागरिकांना व गणेश मंडळांना केले आहे.
What's Your Reaction?






