संग्राम जगताप यांच्यावर राष्ट्रवादी करणार कार्यवाई, अजित पवारांचा इशारा...!

संग्राम जगताप यांच्यावर राष्ट्रवादी करणार कार्यवाई, अजित पवारांचा इशारा...!
मुंबई, दि.11(डि-24 न्यूज)-
अहिल्यानगर(अहमदनगर)चे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे सध्या विवादास्पद वक्तव्यावरून वाद उफाळला आहे. मागिल काही दिवसांपासुन त्यांची हिंदूत्ववादी भुमिकेमुळे राजकारण पेटले आहे. त्यांनी दिपावली सणानिमित्त प्रत्येक नागरीकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. हे वक्तव्य केल्याने वाद उफाळला आहे. पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्राम जगताप यांचे विधान चुकीचे आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर जवाबदारी वाढली आहे. वडीलांचे छत्र राहीले नाही पण तो सुधारत नाही त्याची भुमिका पक्षाला मान्य नाही पक्षाचे हे धोरण नाही. असे म्हणत पक्षाकडून कार्यवाईचा इशारा दिला. पक्षातून त्यांची हकालपट्टी होणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुस्लिम मतांवर निवडून आल्यानंतर विरोधी वक्तव्य ते सतत करत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला फटका बसू शकतो यामुळे पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?






