समाजवादी पार्टी मनपा निवडणुकीच्या मैदानात, दहा प्रभागातून उमेदवार देणार...
समाजवादी पार्टी मनपा निवडणुकीच्या मैदानात, दहा प्रभागातून देणार उमेदवार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) - समाजवादी पार्टीच्या वतीने शहरात महापालिका निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. समविचारी पक्षांसोबत युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. युती झाली नाही तरीही दहा प्रभागातून 40 उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी पक्षाने केली आहे. बुधवारपासून इच्छूकांना अर्जाचे वितरण सुरू झाले आहे. 10 इच्छूकांनी अर्ज घेतले आहे. महीला जिल्हाध्यक्ष शाहीन पठाण व अजमत शेख यांची पत्रकार परिषदेत उमेदवारीची घोषणा करण्यात आली. विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढणार असल्याचे शहराध्यक्ष अयुब पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याप्रसंगी प्रदेश महासचिव अब्दुल रऊफ यांनी म्हटले राज्यात 29 महापालिका निवडणुक होत आहे. ज्या महापालिका क्षेत्रात पक्षाची ताकत आहे तेथे उमेदवार देणार आहे. सत्ताधारी पैशाच्या जोरावर निवडणूक लढत आहे आम्ही विचारांची लढाई लढत आहोत. शहरात अतिक्रमणाच्या नावावर गरीबांची घरे पाडली. या कार्यवाहीत हजारो लोक बेघर झाले व रोजगार बुडाला. त्यांना मोबदला पण दिला नाही. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रमुख विरोधी पक्षांनी प्रयत्न केला नाही. तर अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सत्ताधारी व विरोधक मिळून हा मुद्दा सोडवू शकले नाही. आरोग्य व शिक्षणाचा प्रश्न आहे. समाजवादी पक्षाचे नगरसेवक निवडून दिले तर सर्व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जातीय सलोखा निर्माण करणार व युवकांना रोजगार कसा मिळवून देता येईल यासाठी महापालिकेतून कौशल्य विकास कोर्सेस, महीला सुरक्षा, त्यांच्यासाठी शहरात सार्वजनिक स्वच्छता गृह निर्माण केली जातील असे आश्वासन दिले.
What's Your Reaction?