सरकारचे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, स्पर्धा परीक्षेत होणारा घोळ थांबवा- सुनिलदादा गव्हाने

 0
सरकारचे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, स्पर्धा परीक्षेत होणारा घोळ थांबवा- सुनिलदादा गव्हाने

सरकारचे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, स्पर्धा परीक्षेत होणारा घोळ थांबवा- सुनिलदादा गव्हाने

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरणार...

औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) सरकार इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मोठमोठे होर्डिंग्ज व बैनरबाजी करत गवगवा केला जात आहे सामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. सरकारी पैशांची उधळपट्टी करुन राजकीय पोळी भाजली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाने यांनी दिला आहे.

शहरातील राष्ट्रवादी भवन येथे दुपारी आयोजित पदाधिकारी यांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 

व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण तांबे, शहराध्यक्ष सुशिल बोर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते. नियुक्ती पत्र दिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

त्यांनी पुढे सांगितले स्पर्धा परीक्षेचे खाजगी कंपन्यांकडून सध्या लूट सुरू आहे. परीक्षेचे शुल्क एक हजार रुपये घेतले जात आहे. दुस-या राज्यात हे शुल्क शंभर दोनशे रुपये घेतले जातात. स्पर्धा परीक्षेत घोळ होत आहे. तलाठी परीक्षेचे पेपर फुटी प्रकरणात तर थेट मंत्रालयातून फोन आले असल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाच्या भरती परीक्षेचा पण पेपर फुटला हे प्रकरण कोठे तरी थांबले पाहिजे. सरकारच्या जवळचे लोकांना फायदा पोहचवण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. बाटू..‌ डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिले जो पेपर दिला नाही त्यामध्ये उत्तीर्ण तर जो पेपर दिला नाही त्यामध्ये अनुत्तीर्ण झाले. असे घोळ परीक्षेत सुरु आहे हे कोठेतरी थांबले पाहिजे. कैरीऑनमध्ये सुध्दा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्याशी भेट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मागणी केली जाणार आहे. कैरीऑनचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कैरीऑनचा प्रश्न मार्गी लागला तशाच पद्धतीने राज्यातील विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

शासकीय सेवेत कंत्राटीकरणाचा सुध्दा त्यांनी कडाडून विरोध केला. यामुळे अनुभवी व सक्षम अधिकारी निर्माण होणार नाही. खाजगीकरणावर हे शासन अधिक भर देत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले मग राज्यात निवडणुका का घेतात लोकप्रतिनिधी यांचे पण खाजगीकरण करुन टाका. निवडणुकांवर एवढा खर्च कशाला ते पण वाचतील असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका

केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow