सरन्यायाधीशांवर हल्ल्याच्या निषेधार्थ 14 ऑक्टोबर रोजी मुक मोर्चा...!

सरन्यायाधीशांवर हल्ल्याच्या निषेधार्थ 14 ऑक्टोबर रोजी मुक मोर्चा...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर भर कोर्टात बुट फेकण्याचा प्रयत्न झाला. हा हल्ल्याचा प्रयत्न व्यक्तीगत सरन्यायाधीश यांच्यावर तर आहेच. त्यासोबतच भारतीय न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे. खरे तर हे गुन्हेगारी कृत्य आहे. यासाठी रमेश किशोर तिवारी या वकीलाला अटक होणे गरजेचे होते. मात्र पोलिस प्रशासनाने त्याच्या विरोधात कोणतीही तक्रार आलेली नाही असे सांगत सनातनी दया दाखवली. भिरकावण्यासाठी काढलेल्या जोड्यासह या व्यक्तीची सुटका करण्यात आली. न्यायालयात दिलेली घोषणाही गंभीर आहे. सनातनी धर्माचा अपमान सहन करणार नाही असे राकेश किशोर तिवारी याने कोर्टात म्हटले. मला या कृत्याचा पश्चात्ताप नाही मी माफीही मागणार नाही असे भाष्य केले. हि व्यक्ती नाही तर प्रवृत्ती आहे. या व्यक्तीला अटक होऊन कार्यवाही करावी, या वृत्तीचा निषेध करण्यासाठी 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुक मोर्चा क्रांतीचौक येथून काढण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने संविधान प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत सुभाष लोमटे यांनी केले आहे. आम्ही भारताचे लोक या संघटनेच्या वतीने हा मुक मोर्चा काढला जात आहे. यावेळी एड के.ई.हरदास, रमेश भाई खंडागळे, जितेंद्र भवर, वैशाली डोळस, एड विजय वानखेडे, प्रा.मच्छींद्र गोर्डे, काॅ.बुध्दीनाथ बराळ, प्रा.भारत सिरसाठ, सुभाष मेहेर आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






