सरन्यायाधीश यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात प्रचंड मुक मोर्चा काढला...!
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात प्रचंड मूक मोर्चा.....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात प्रचंड मूक मोर्चा काढण्यात आला.
भर उन्हात क्रांती चौकातून निघालेला मोर्चा, पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोंचला.
"आम्ही भारताचे लोक" चे पुढाकाराने निघालेल्या मोर्च्यात,. आम्ही भारताचे लोक व सर्व परिवर्तन वादी संघटनांचे कार्यकर्ते या मूक मोर्चात सहभागी झाले होते.
पंतप्रधानांनी जरी या हल्ल्याचा विरोध केला असला तरी , त्यांचे मातृसंस्थेची मंडळींचे मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याने, देशातील विविध भागात शेकड्याने पोलिस केसेस दाखल झाल्या आहेत.
एका माथेफिरूने महात्मा गांधी यांचा खून केल्यावर कट्टर हिंदुत्ववाद्यांनी देशभर पेढे वाटले होते, अशा बातम्या त्या वेळी व आताही समाजमाध्यमावर आपण वाचतोच आहोत.
गांधीचा खून करणारा माथेफिरू व गवई वर हल्ला केलेला माथेफिरू यांची जातकुळी एकच असल्याचे सिद्ध होते.
केंद्र व राज्यातील सरकार संविधान बाबत कितीही दिंडोरा पिटत असले तरी, अशा हल्लेखोर मनोरुग्ण माथेफिरूंना याच सत्ताधाऱ्यांचा आधार वाटतो ही वस्तुस्थिती आहे.
मूक मोर्चा चे द्वारे निषेध नोंदवणे गरजेचेच होते, पण अशा माथेफिरू प्रवृत्तींचा बीमोड करण्याची रणनीती आखावी लागेल, त्याच बरोबर सर्व परिवर्तनवाद्यांना भक्कम एकजूट करूनच ते शक्य होईल, त्यासाठी नजिकच्या काळात शहरात, भव्य अशी परिषद घ्यावी असे आवाहन, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस व जय किसान आंदोलन - स्वराज अभियान चे साथी सुभाष लोमटे यांनी केले.
यावेळी राष्ट्रपतींना द्यायचे निवेदन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना देण्यात आले, त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात रमेशभाई खंडागळे,सुभाष महेर, अनंत भवरे, , शेख पाशू , प्रकाश दाणे, इ. चा समावेश होता.
आजच्या मूक मोर्चात प्रा. भारत शिरसाट, सत्यशोधक समाजाचे ऍड. के. ई. हरिदास, साथी अण्णा खंडारे, प्रा. राम बाहेती, डॉ प्रकाश शिरसाट, डॉ उमेश बगाडे डॉ ऋषिकेश कांबळे, डॉ मच्छिंद्र गोरडे, डॉ उमाकांत राठोड जया गजभिये कॉ. मधूकर खिल्लारे, प्रा. एच. एम. देसरडा, ऍड. वैशाली डोळस, बाबा गाडे, मुकुंद सोनवणे, अँड एस आर बोदडे, कॉ भीमराव बनसोड, लक्ष्मण भूतकर, रतनकुमार साळवे, साथी सुलभा खंदारे, ऍड. डी. वी. खिल्लारे, प्रा.श्रीराम जाधव, शैलेंद्र मिसाळ, नौशाद उस्मान, दैवशाला गवंदे, अशोक तिनगोटे, अंबादास रगडे, किशोर म्हस्के, कॉ भगवान भोजने, कॉ बुद्धिनाथ बराळ, रमाकांत पाठक, अँड विजय वानखडे, सोपान थोरे, सरला सदावर्ते, रत्नकला बनसोडे ज्योत्स्ना कांबळे, अशोक जायभाय, साथी देविदास किर्तीशाही, साथी छगन गवळी, डॉ प्रज्ञा साळवे, वैशाली शिरसाट, प्रा.तारा जाधव, नसीम कासमी, दीपक म्हस्के, शेख रशीद, साथी भाऊ पठाडे ग ह राठोड, चुन्नीलाल जाधव, पंडित बोर्डे, श्रीरंग ससाणे, मधुकर गवंदे, सविता अभ्यंकर, सुरेखा चौरपगार, अँड सचिन गडले, रत्नाकर खंडागळे, विष्णू वखरे, भीमसेन कांबळे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?