सल्लागाराची नियुक्तीनंतर अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना लाभ कधी मिळेल...

4 वर्षाच्या संघर्षानंतर मार्टी संस्थेच्या अंमलबजावणीला सुरुवात, लढा अजून संपलेला नाही...
एवढी आंदोलने यानंतरही फक्त सल्लागाराची नियुक्ती होणार, स्टाफ कधी भरणार, विद्यार्थ्यांना कधी मिळणार लाभ अजून गुलदस्त्यात
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) -
4 वर्षांचा संघर्ष पाठपुराव्यानंतर राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी मार्टी कृती समीताने अनेक आंदोलने केली. आमदारांनी लक्षवेधी मांडली. शासनाने अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था(मार्टी) या संस्थेच्या माध्यमातून एका सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी जाहिरात काढली. अधिकारी-कर्मचारी भरती कधी होणार. या संस्थेच्या माध्यमातून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना लाभ कधी मिळणार अजून गुलदस्त्यात आहे. या संस्थेला आतापर्यंत निधीची तरतूद करण्यात आली नाही. ट्रेनिंग कोठे मिळणार, कोणत्या कोर्ससाठी मिळणार अजून निर्णय झालेला नाही. सल्लागाराची नियुक्तीनंतर अंमलबजावणीची अपेक्षा आहे.
मार्टी कृती समीती, महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षांपासून संस्था प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने झटत आहे. शासनाने 22 ऑगस्ट 2024 रोजी या संस्थेच्या स्थापनेला मान्यता दिली होती. मात्र प्रत्यक्ष कार्यवाही काही कारणास्तव रेंगाळली होती. अनेक निवेदने, आंदोलने, पत्रकार परिषदा आणि विधानसभेतील सूचना यांचा अवलंब करत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये विविध पक्षांचे आमदार, सामाजिक कार्यकर्ते आणि अल्पसंख्यांक संघटनांचा सक्रीय सहभाग होता. 24 जुलै रोजी मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मार्टी संस्थेच्या अंमलबजावणीस गती देण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला. मार्टिच्या माध्यमातून राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक प्रशिक्षणाची संधी देणार आहे. एका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिका-याची सल्लागार पदी नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. हि नियुक्ती करार पध्दतीने होईल. अर्ज नमुना आणि अटी https://mdd.maharashtra.gov.in अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. पत्ता..अल्पसंख्यांक आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर. मार्टि कृती समीतीचे अध्यक्ष अॅड अझहर पठाण यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले सल्लागाराची नियुक्तीची जाहारात प्रसिध्द झाली. अधिकारी-कर्मचारी भरती कधी होईल. ट्रेनिंग कधी सुरु होईल. कोठे होईल. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना लाभ मिळेपर्यंत कृती समीतीचा लढा सुरु राहणार आहे.
What's Your Reaction?






