सामान्य जनतेशी असलेली बांधिलकी जपा - जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ

 0
सामान्य जनतेशी असलेली बांधिलकी जपा - जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ

सामान्य जनतेशी असलेली बांधिलकी जपा – जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ

सातारा – देवळाई येथे शिवसेनेच्या जोरदार बैठका

छत्रपती संभाजीनगर, (औरंगाबाद), दि.8(डि-24 न्यूज)

आपण सर्व शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्व आणि सामाजिक विचाराने घडलेले शिवसैनिक आहोत, सर्व सामन्यांच्या अडचणीत धावून जाणे हीच आपली खरी ओळख आहे. आपली बांधिलकी जनतेशी आहे निवडणुका असो किंवा नसो जनतेशी असलेली बांधिलकी कायम जपा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केले. शिवसेनेच्या वतीने शहरात संपर्क अभियान सुरू असून आज सातारा – देवळाई भागात आयोजित बैठकी प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पश्चिम शहरात संपर्क अभियान सुरु आहे. या अंतर्गत आज सातारा – देवळाई भागात बैठका घेण्यात आल्या. बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी शहरप्रमुख विजय वाघचौरे यांनी संघटना सक्षम असेल तर कितीही मोठे आवाहन असले तरी आपण सहज पेलू शकतो. संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.

महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पाताई वाडकर यांनी प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत राजकारणात ही महिला काम करण्यास इच्छुक आहेत अशा महिलांचा संघटनेत समावेश करून घेण्याचे आवाहन केले.

याबैठकीप्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख विजयजी वाघचौरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शिल्पाताई वाडकर , उपजिल्हाप्रमुख प्रा.संतोष बोर्डे, विधानसभा संघटक संतोष मरमट , प्रसिद्धीप्रमुख अभिजीत पगारे, उपशहरप्रमुख रणजीत ढेपे, संजय भुजबळ , शिवाजी हिवाळे, प्रवीण मोहिते विभागप्रमुख रामेश्वर पेंढारे , ईश्वर पारखे, अविनाश जवळगेकर, नंदकुमार उढान, आकाश राठोड, उपविभागप्रमुख गजानन पाटील , रामेश्वर घाडगे, प्रदीप गाडेकर, गणेश बन्सवाल, समाधान चौधरी , सचिन वाघ, शरद चव्हाण, समाधान पाटील, अर्जुनसिंग राजपूत, महेश नाईकवाडे, बालाजी मोरे, महेश विभुते, रामनाथ फलके , महिला आघाडीच्या उपशहरप्रमुख लक्ष्मीताई म्हस्के ,अर्चनाताई चव्हाण , कावेरी पडघकर , अल्का कांदे, वंदना पवार, ऋचा धागडे, मीना चिकटे आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow