सामुहिक बलात्काराच्या घटनेने हादरले शहर, मानलेल्या भावानेच केला घात, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 0
सामुहिक बलात्काराच्या घटनेने हादरले शहर, मानलेल्या भावानेच केला घात, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हात पाय बांधून महिलेवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले शहर, दागिनेही लुटले, केम्ब्रिज चौकाजवळ घडली घटना

मानलेल्या भावाला बेड्या ; दोन जणांचा शोध सुरू...

2 हजार उसने देतो म्हणाला

तिघांनी मिळून केला बलात्कार...

औरंगाबाद, (डि-24 न्यूज) 2 हजार रुपये उसने देण्याचा बहाणा करत मानलेल्या भावाने दोन मित्रांसह एका 38 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने शहर हादरले. ही घटना शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास जालना रोडवरील केंब्रिज चौका जवळ घडली. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. प्रकरण संवेदनशील आहे तपास सुरू आहे. दोन फरार आरोपिंना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक गौतम पतारे यांनी दिली आहे. 

पिसादेवी परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय महिलेने शुक्रवारी दुपारी मानलेला भाऊ संजय (नाव बदलले आहे) याला फोन केला. माझी कोर्टात केस सुरू असून मी आर्थिक अडचणीत आहे. मला 2 हजार रुपये उसने हवे आहेत, असे तिने त्याला सांगितले. संजयनेही दोन हजार रुपये देण्याची तयारी दाखवली. तिला सावंगी बायपास रोडवर बोलवून घेतले. सावंगी बायपास रोडवर दोघांची भेट झाली. थोडा वेळ चर्चा झाल्यानंतर संजयने तिला माझ्यासोबत चल असे म्हणून दुचाकीवर बसविले. दुचाकी थेट केंब्रिज चौकाकडे घेऊन गेला. तोपर्यंत रात्रीची 8 वाजले होते. तेवढ्यात पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवर दोन अनोळखी इसम आले. 

तिला फरफटत नेले झाडीत...

केंब्रिज चौकातील हॉटेल सूर्याच्या पाठीमागील झाडीत या तिघांनी तिला अक्षरशः फरपटत नेले. तिने विरोध केला तर त्यांनी तिला मारहाण केली. आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबला. अंगावरील कपड्यांनीच तिचे हात पाय बांधले. त्यानंतर असहाय्य या महिलेवर तिघेही तुटून पडले. आळीपाळीने बलात्कार केला तसेच तिच्या अंगावरील 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दहा हजार रुपयांचा मोबाईल लुटून नेला. या हैवानाच्या तावडीत सुटून महिलेने कसेबसे घर गाठले. घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्या दोघांनी अखेर सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून शनिवारी फिर्याद दिली.

मानलेल्या भावानेच केला घात...

पिसादेवी परिसरात राहणाऱ्या या 38 वर्षीय महिलेची कोर्टात केस सुरू आहे. त्यामुळे ती आर्थिक अडचणीत आली होती. यात आर्थिक अडचणीचा मानलेला भाऊ संजयने फायदा घेतला. तिला दोन हजार रुपये मदत करण्याची तयारी दाखवली महिलेला भेटायला बोलावले. मित्रांच्या मदतीने आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow