साहेबखान पठाण यांनी एमआयएमसाठी सोडले मैदान, इम्तियाज जलील यांचा प्रचार करणार...!
 
                                 
साहेबखान पठाण यांनी एमआयएमसाठी सोडले मैदान, इम्तियाज जलील यांचा प्रचार करणार...!
औरंगाबाद, दि.29(डि-24 न्यूज) समाजसेवक अपक्ष उमेदवार साहेबखान पठाण यांनी मुस्लिम मतांचे विभाजन टाळण्यासाठी एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना बिनशर्त पाठिंबा देत आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती डि-24 न्यूजला पक्षाचे प्रवक्ते एड खिजर पटेल यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले साहेबखान पठाण यांचे शहरात सार्वजनिक कार्य चांगले आहे. इम्तियाज जलील यांच्या रुपाने मुस्लिम नेतृत्व उदयास आले असल्याने ते सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकास करत असल्याने सर्व स्तरातून त्यांना या निवडणुकीत पाठिंबा व प्रतिसाद मिळत आहे म्हणून साहेबखान पठाण हे प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. त्यांना खिजर पटेल यांनी लाडू तोंडात भरवून आभार मानले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            