उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
उमेदवारी अर्ज माघारीसाठी सोमवारी (दि.२९)अंतिम दिवस
औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 19-औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी सोमवार दि.29 रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अंतिम दिवस आहे.
19 औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी दि.25 पर्यंत उमेदवारी दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण 51 उमेदवारांचे 78 अर्ज दाखल होते. दि.26 रोजी झालेल्या छाननीत त्यापैकी 44 जणांचे अर्ज वैध ठरले तर 7 जणांचे अर्ज अवैध ठरले. आता सोमवारी (दि.29) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. सकाळी 9 वा. 45 मिनिटे ते दुपारी 3 यावेळात उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सुविधा कक्षात व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.
What's Your Reaction?