सिडको एन-6 मध्ये युवकाचा खून, आरोपींना अटक...

सिडको एन-6 मध्ये युवकाचा खून, आरोपींना अटक...
गणेश मंडळच्या जागेवर खडी हटविण्याच्या जागेवरुन झाला वाद...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) -
श्री गणेश मंडळाच्या मंडपाच्या जागेवर टाकलेली खडी उचलण्याच्या वादात तीव भावांनी एका युवकाची हत्या केल्याने एन-6 सिडको, संभाजी काॅलनीत खळबळ उडाली. मृतकाचे नाव प्रमोद रमेश पाडसवान (वय 38) आहे. वडील रमेश जगन्नाथ पाडसवान, नातू रुद्राक्ष, आई मंदाबाई या घटनेत जखमी झाले आहे. चाकूने प्रमोद वर चार वार करण्यात आले. जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता दुपारी 3 वाजता डाॅक्टरांनी मृत घोषीत केले. रमेश व रुद्राक्ष, वय 16 वर उपचार सुरु आहे.
आज शुक्रवारी सकाळी आरोपी जेसीबी घेऊन गणेशोत्सवासाठी जागा साफसफाई करण्यासाठी तेथे गेले असता तेथे खडी हटवण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन्ही गटात वाद विवाद झाला. स्थानिक लोकांनी मध्यस्थी करत वाद शांत केला. दुपारनंतर वाद पुन्हा सुरु झाला. प्रमोदने यावेळी सांगितले उत्सव साजरा करा पण माझी जागा खाली करा. या प्रकरणात आरोपी ज्ञानेश्वर काशिनाथ निमोने, गौरव काशिनाथ निमोने, सौरव काशिनाथ निमोने हे स्वतः सिडको पोलिस ठाण्यात जावून सरेंडर केले. आरोपींना पोलिसांनी अटक केली. प्रमोदची काॅलनीत किराणा दुकान आहे. मागच्या वर्षी सिडकोचा प्लाॅट खरेदी केला जेथे गणेश मंडळाचा शेड आणि सामान ठेवले जात होते. सिडकोने अतिक्रमण काढून प्लाॅट पाडसवानच्या कब्जात दिले होते. तेव्हापासून दोन्ही कुटुंबात वाद सुरु होता. पाडसवानने जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. रमेश पावसवाने यांच्या फिर्यादीवरुन आरोपींच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झालेल्या हत्या प्रकरणी उद्या सकाळी दहा वाजता घटनास्थळ येथून सिडको पोलिस ठाण्यावर मोर्चा काढणार आहे. आरोपी बाबत योग्य माहिती मिळत नसल्याने जाब विचारण्यासाठी मोर्चा काढणार आहे. योग्य कार्यवाही होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
What's Your Reaction?






