सिडको एन-7 भागात अतिक्रमण निष्काशित
सिडको एन-7 भागात अतिक्रमण निष्कशीत
औरंगाबाद, दि.13(डि-24 न्यूज) महानगरपालिका आणि सिडको कार्यालयाच्या वतीने संयुक्तरीत्या आज एन-7 येथील मेन रोड लगत असलेल्या नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस संख्यिकी कार्यालय या शासकीय इमारतीच्या परिसरात सिडको ने सदर इमारतीमध्ये शासकीय कार्यालयासह काही खाजगी लोकांना सदर विक्री व भाड्याने दिलेले आहे. विक्री पण केलेले आहे. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी श्री घडामोड सह इतर लोकांचे अतिक्रमण होते. याबाबत सिडको कार्यालयाच्या उपलब्ध नकाशा नुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटवा विभागाने जानेवारी महिन्यात यांना जाहीर मोजमाप करून पंचनामा करून मार्किंगसह जास्तीचे बांधकाम बाबत कळविण्यात आले होते. त्या दृष्टीने वैभव घडामोडी यांनी खुल्या जागेवर कार्यालय परिसरातील खुल्या जागेवर पंधरा बाय पंधरा व दहा बाय दहा अशा दोन रूम बांधून वाणिज्य वापर सुरू केला होता. याशिवाय त्यांचे दुसरे बंधू यांनी प्रिटींग प्रेसच्या व्यवसाय या ठिकाणी टाकलेला आहे त्यांनी सुद्धा आपल्या मूळ जागेपेक्षा सहा सहा फूट पार्किंगच्या समोरील जागेत आरसीसी स्लॅब टाकून दुकाने काढली होती व ही दुकाने इतर लोकांना भाड्याने दिली होती. यामध्ये चहाचे दुकान पान टपरी चे दुकान अशा स्वरूपाचे अतिक्रमण होते व त्यांनी खाजगी लोकांना भाड्याने दिले होते त्यांना याबाबत अवगत करून देखील त्यांनी मनपा प्रशासन व सिडको कार्यालयास सहकार्य केले नाही काही भाग त्यांनी स्वतः काढून घेतलं परंतु मूळ अतिक्रमण खुल्या जागेवरील न काढल्याने इतर कार्यालयाला पाण्याच्या टँकर पाण्याच्या हातचा वापर करता येत नव्हता म्हणून सदर दोन्ही रूम त्यांनी सिमेंट माती विटा मध्ये वापर करून बांधकाम केले होते ते आज जेसीबीच्या साह्याने निष्काषित करण्यात आले. मागील पंधरा वर्षापासून हे अतिक्रमण होते.
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 5 श्रीमती सविता सोनवणे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, सिडकोचे उप अभियंता उदयराज चौधरी, सर्वेयर मिलन खिल्लारे, अतुल मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
What's Your Reaction?