सुभाष झांबड यांना 12 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कस्टडी...!

सुभाष झांबड यांना 12 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कस्टडी...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) अजिंठा अर्बंन को.ऑप.बँक मर्यादित घोटाळ्यात बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी आमदार सुभाष मानकचंद झांबड(वय 63), राहणार कामगार चौक जवळ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मिळालेला असून गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार हे तपास करीत आहेत.
काय आहे बँक घोटाळ्याचे प्रकरण....
सिटीचौक पोलिस ठाण्यात गुरन.354/2023 कलम 406, 409, 420, 465, 467, 468, 471, (अ), 34, 120(ब) भादवी सह कलम 3 व 4 MPID अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यात चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी व कर्मचारी, सनदी लेखापाल यांनी आपसात संगणमत करुन दिनांक 1/3/2006 ते 30/8/2023 या कालावधीत बनावट 36 एफडी अगेनेस्ट लोन प्रकरणे तयार करून विनातारण असुरक्षित कर्ज वितरण करुन बँकेच्या लेजर बुकमध्ये व बनावट नोंद घेऊन तसेच दिनांक 31/01/2023 रोजीला एस.बी.आय.बँक, अॅक्सीस बँक आणि एम.एस.सी.बँक औरंगाबाद या बँकेच्या खात्यात त्यांचे जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्तीच्या रकमेचे खोटे व बनावट बँक बॅलन्स प्रमाणपत्र तयार करून तसेच खोटा हिशोब दाखवून ताळेबंद तयार करून बँकेचे सुमारे 91.41 कोटी रुपये रकमेचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केली आहे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त नितिन बगाटे, पोलिस उपायुक्त(गुन्हे शाखा) प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त(गुन्हे) सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार करत आहे.
What's Your Reaction?






