सुलेमान खानच्या खुनाचा तपास उच्च न्यायालयाच्या निरीक्षणातच व्हावे - भाकपची मागणी

सुलेमान खान खुनाचा तपास मा. उच्च न्यायालयाच्या निरीक्षणातच व्हावे - भाकपची मागणी
अल्पसंख्यांक देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा लढणार... !
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) -
दलित, मुस्लिम, ख्रिश्चन , आदिवासी इत्यादी अल्पसंख्याकांवर वाढत्या हल्ल्याने विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे रोशन गेट येथे निदर्शने करण्यात आली. बेटावड, जामनेर येथील सुलेमान खान वय 21 वर्षे याच्या खुनाचा तपास हा उच्च न्यायालयाच्या निरीक्षणात झाला पाहिजे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. यावेळी उपस्थित अल्पसंख्यांकांनी देशातील एकात्मतेसाठी , शांततेसाठी संवैधानिक लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
याबाबत असे की, समाजकंटक गेल्या अनेक वर्षांपासून काही बहुजन हिंदूंच्या डोक्यात मुस्लिम ख्रिश्चन आणि दलितांबद्दल द्वेष निर्माण करून त्यांच्यावर हल्ले होतील अशी परिस्थिती निर्माण केली आहे. दाढी टोपी बघून हल्ले करणे, शिक्षण घेत असणाऱ्या मुस्लिम दलित, ख्रिश्चनांना मारहाण करणे, मॉब लिंचिंग करून त्यांचा खून करणे, मस्जिद विहार आणि चर्चवर हल्ले करणे असे प्रकार वाढले आहेत. हल्ले करणारे सर्वसामान्य घरातले असतात आणि हल्ले करायला लावणाऱ्यांची मुले परदेशात शिक्षण घेतात, अशी परिस्थिती आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी भाकपाने आज रोशन गेट येथे निदर्शने केली. यावेळी अल्पसंख्याकांवरील हल्ले बंद करा, सुलेमान खानला न्याय मिळालाच पाहिजे, मंदिर, मशिदी, विहारे यावर हल्ले करणे बंद करा, बौद्धगया पुन्हा बौद्धांच्या ताब्यात द्या, दाढी टोपी बघून हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करा, अल्पसंख्याकांना संरक्षण द्या, आरएसएस भाजपाच्या पुढार्यांची मुले परदेशात शिकायला आणि बहुजनांची मुले मारामारी करायला, गुन्हे अंगावर घेऊन करिअर बरबाद करून घ्यायला ये नही चलेगा इत्यादी घोषणांनी रोशन गेट दणाणून गेला. यावेळी अॅड . अभय टाकसाळ, समाजवादी पार्टीचे वसीम खान, सिकंदर खान, फिरोज खान पैलवान , जुबेर शेख, शेख मेहबूब, अमजद खान, कासीम कीस्मतवाला , सलीम खामगावकर, एम. डि. फारुख, शेख अमजद, अजहर इनामदार
, समाधान पारधे, अॅड उमेश इंगळे, एजाज शेख, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
What's Your Reaction?






