स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाने कंबर कसली...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाने कंबर कसली...
पुढील आठवड्यापासून जिल्ह्यात बैठकांचा धडाका...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- पुढील आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पुढील आठवड्यापासून 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. पक्षाचे निरीक्षक माजी आमदार चंद्रकांत दानवे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या बैठका होणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुक लढण्यास इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पक्षाचे जेष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी, सर्व तालूका अध्यक्ष, सर्व फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालूका पदाधिकारी यांनीही उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
दिनांक 7/11/2025 सकाळी 10 वाजता, शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) तालूका, दुपारी 1 वाजता फुलंब्री, दुपारी 4 वाजता सिल्लोड, दिनांक 8/11/2025
सकाळी 10 वाजता, शनिवारी, तालुका सोयगाव, दुपारी 1 वाजता कन्नड, दुपारी 4 वाजता खुलताबाद , दिनांक 9/11/2025 सकाळी 10 वाजता, रविवारी वैजापूर, दुपारी 1 गंगापूर, दुपारी 4 वाजता छत्रपती संभाजीनगर, पश्चिम, बजाजनगर
दिनांक 10/11/2025, सोमवार, सकाळी 11 वाजता पैठण तालुक्यात कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, पक्ष निरीक्षक माजी आमदार चंद्रकांत दानवे, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण, माजी आमदार किशोर चव्हाण, महीला जिल्हाध्यक्ष श्रीमती छाया जंगले, प्रदेश सरचिटणीस प्राचार्य सलिम शेख आदी उपस्थित राहणार आहेत.
What's Your Reaction?