स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी सफाई मित्र सुरक्षा शिबिर
 
                                स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता कर्मचारी यांच्या साठी सफाई मित्र सुरक्षा शिबीर
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)
स्वच्छता ही सेवा 2024 या पंधरवड्याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने "सफाई मित्र सुरक्षा शिबीर" या कार्यक्रमाअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व स्वच्छता
कर्मचारी यांच्या साठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला संपूर्ण स्वच्छता कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासणी केली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागाने या शिबिराचे आयोजन केले होते त्या मध्ये सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात प्रामुख्याने रक्त तपासणी, इसीजी, डोळे तपासणी, जनरल फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, रक्तदाब तपासणी, इ यांच्या तपासणी करण्यात आल्या.
या शिबिराला 742 स्वच्छता कर्मचारी हजर राहून त्यांनी आरोग्य तपासणी केली, महिला कर्मचारी यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. 450 कर्मचारी यांची संपूर्ण रक्त तपासणी यावेळी करण्यात आली. महानगरपालिका आरोग्य विभागाची टीम यावेळी उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. पारस मंडलेचा व घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख श्री. रवींद्र जोगदंड यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी डॉ. राणे (सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी) डॉ. मापारी, डॉ. कराड, डॉ. तलत काझी, डॉ. आलिया, डॉ. फरहीन, डॉ. सागर संपत, डॉ. पूजा चनखोरा इ. आरोग्य अधिाकरी, श्री.बाशीद, (नेत्रतज्ञ सहाय्यक), श्री. गायकवाड (नेत्रतज्ञ सहाय्यक, लाइन्स क्लब) डॉ. विजय विठोरा स्त्रीरोगतज्ञ, डॉ. वैशाली कोळंबीकर त्वचारोग तज्ञ, डॉ. गणेश सोनवणे फिजिशियन इत्यादी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरील शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्य केले. विद्या शर्मा, आशिष पाटील व जे.जे हॉस्पिटलच्या टीमने रुग्णाचे ई.सी.जी काढुन आणि श्री. राहुल पटेल, श्री. मानवतकर, श्रीमती जयश्री बोर्डे यांनी औषधी वितरण करुन तसेच श्री. रणवीर गुलाब, श्री.गीता दशहरे, 4 H.LL चे फेलबोटोमायटीस यांनी रक्त तपासण्या करुन शिबीरात सहभाग घेतला.
तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सनियंत्रण अधिकारी श्री. धीरज चव्हाण, स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव, विशाल खरात, शहर समन्वयक किरण जाधव, चेतन वाघ, सुयोग सिरसाठ, अमन बीडला, इ यांनी कार्यक्रम नियोजन केले होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            