स्वच्छता ही सेवा जनमानसात श्रमदान करून सहभाग, नेत्यांनी स्वच्छ रस्त्यावर चालवला झाडू
जेथे स्वच्छता तेथे धन्वंतरी-
डॉ.भागवत कराड
स्वछता ही सेवा उपक्रमात जनमानसाने श्रमदान करून सहभाग नोंदवला
स्वच्छ व निर्मळ रस्त्यावर चालला झाडू अशी चर्चा या स्वच्छता अभियानानंतर शहरात सुरू
औरंगाबाद, दि.1(डि-24 न्यूज)
केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार व स्वच्छ महाराष्ट्र संचालनालय यांच्या निर्देशानुसार स्वच्छता ही सेवा व स्वच्छतेचा पंधरवडा हा उपक्रम 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर -2023 या कालावधीत मध्ये सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. दि.2 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली देणे हेतूने एक ऑक्टोबर एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान या उपक्रमा अंतर्गत आज शहरात महानगरपालिकेच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन प्रसंगी केंद्रीय वित्त राज्य मंत्री डॉ भागवत कराड व मा ना पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी प्रतिपादन केले.
आज महानगरपालिकेच्या वतीने शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या पासून ते क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, सौरभ जोशी,उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, उप आयुक्त मंगेश देवरे, नंदा गायकवाड, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना राणे, कार्यकारी अभियंता बी डी फड, आर एन संधा, सहायक आयुक्त संजय सुरडकर, रमेश मोरे, जिल्हा व्यापारी महासंघ प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर फर्स्ट, एकोसत्व चे प्रतिनिधी,डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सदस्य प्लॉग्गर्स ग्रुप, सेवाभावी संस्था व मनपा अधिकारी ,कर्मचारी,नागरी मित्र पथक कर्मचारी, महिला बचतगट प्रतिनिधी ,नागरिक,शालेय विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ भागवत कराड यांनी स्वच्छ्तेचे महत्व सांगितले. ते पुढे म्हणाले की जेथे स्वच्छता तेथे धन्वंतरी असते. त्यामुळे सर्वांनी स्वच्छता बाबतीत नेहमी जागरूक असले पाहिजे.
शहागंज ते क्रांती चौक या मार्गावर महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी रस्त्याच्या कडेला असलेला कचरा गोळा करण्यात आला. यात प्लॅस्टिक कचरा जास्त प्रमाणात होता.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते
स्वच्छता संदेश व स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
झोन क्र ०१ व ०२ यांच्या वतीने plog रन मार्गावर विविध ठिकाणी
अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार शहरांमध्ये 562 ठिकाणी स्वच्छतेचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये एकूण 63 टन कचरा गोळा करण्यात आला असून सदरील कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात आला
यामध्ये शहरातील सर्व प्रशासकीय प्रभाग व 115 वॉर्ड मध्ये स्वच्छतेचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, यामध्ये महानगरपालिका शाळा , मुख्य रस्ते , वॉर्डातले अंतर्गत रस्ते, शहरातील महानगरपालिका शासकीय दवाखाने, व्यवसायिक ठिकाणे , रेल्वे स्टेशन बस स्टँड, पर्यटन स्थळे, लेणी परिसर पर्यटन मंडळ , बाजारपेठ व खाम नदी परिसर इत्यादी ठिकाणी श्रमदान करण्यात आले.
What's Your Reaction?