स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत "खेळ पैठणीचा" कार्यक्रम उत्साहात
स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत "खेळ पैठणीचा" कार्यक्रम उत्साहात संपन्न
15 महिलांनी जिंकल्या पैठणी...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या दरम्यान स्वच्छता ही सेवा हे हे अभियान राबविले जात आहे.
या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली आज 28 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालय प्रांगणात क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत "खेळ पैठणीचा जागर स्वच्छतेचा सन्मान महिलांचा" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महानगरपालिकेत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळ पासूनच कार्यक्रम स्थळी महिलांची गर्दी होत होती. या कार्यक्रमाला महानगरपालिका महिला अधिकारी कर्मचारी त्यांचे नातेवाईक ,बचत गट, आशा सेविका, स्वच्छता कर्मचारी यांची लक्षणीय उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रविंद्र जोगदंड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना राणे, कार्यक्रमाचे मुख्य निवेदक सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर, बाल गायिका सह्याद्री मळेगावकर यांची उपस्थिती होती.
न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे मुख्य निवेदक क्रांतीनाना मळेगावकर यांनी आपल्या खुमासदार ,मनोरंजनात्मक निवेदनाने उपस्थित महिलांची व प्रेक्षकांची दाद मिळवली.
त्यांनी विविध खेळांद्वारे महिला प्रेक्षकांना जागेवर खेळवून ठेवले. विविध मनोरंजनात्मक खेळात विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.
मुख्य आकर्षण असलेल्या पैठणीच्या खेळात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण 15 पैठणी जिंकल्या. या सर्व पैठणी जिंकलेल्या स्पर्धकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
उपस्थित महिलांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल महानगरपालिकेचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमामध्ये स्वच्छतेविषयी महिलांमध्ये विविध स्वच्छतेचे खेळ खेळून जनजागृती करण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना उप आयुक्त अपर्णा थेटे व अर्चन राणे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड यांच्या नियोजनात हा कार्यक्र
म पार पडला.
What's Your Reaction?