स्वातंत्र्यानंतर सुध्दा मुस्लिम समाज मागासलेला - हुसेन दलवाई
मुस्लिम समाजाची उन्नतीसाठी आरक्षण आवश्यक - हुसेन दलवाई
21 ऑक्टोबरला मुंबईत आरक्षण परिषद
औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत विविध समाजाची प्रगती झाली तरीही मुस्लिम अल्पसंख्याक समाज हा मागासलेला आहे. देशाच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी या समाजाची प्रगती आवश्यक आहे. राज्यात मराठा, ओबीसी, धनगर समाजाच्या आरक्षणावर चर्चा होत आहे पण मुस्लिम आरक्षणावर कोणी बोलत नाही. शिक्षण व नोकरीसाठी या समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण देने आवश्यक आहे. विविध कमिशन आणि कमिटी काँग्रेसच्या राजवटीत स्थापन झाले. पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आला तरीही सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली नाही. अल्पसंख्याक समाजात विद्वत्ता व कलागुणांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. देश चंद्रयान पर्यंत चालला आहे तरी देशातील मुस्लिम मागास राहीला आहे त्यांना विविध समाजाच्या बरोबरीने आणण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे त्या समाजात पण विद्यार्थ्यांना सवलती मिळाव्यात यासाठी आरक्षण मिळायला हवे त्याला आमचा विरोध नाही. आरक्षणासाठी जनजागृती व्हावी यासाठी राज्यभर आरक्षण परिषद मौलाना आझाद विचार मंचच्या माध्यमातून घेतले जाणार आहे. 21 ऑक्टोबरला मुंबईत भव्य आरक्षण परिषद घेणार आहे यामध्ये राज्यातील लोक उपस्थित राहणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी दिली आहे.
पुढील काळात औरंगाबाद, सोलापूर, धुळे, मालेगाव व विविध शहरांमध्ये आरक्षण परिषद घेऊन सह्यांची मोहीम राबवली जाईल असे दलवाई म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले, अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी सरकारने निर्णय घ्यावे. युवकांना नोकरी, रोजगाराचे व उद्योग व्यापाराचे संधी उपलब्ध करून दिली जायला हवे. विशेष निधीतून मुस्लिम अल्पसंख्याक वस्त्यांचा विकास करावा अशी मागणी दलवाई त्यांनी केली.
सातारा जिल्ह्यातील पुसेसावली गावात उसळलेल्या दंगलीत एका निष्पाप युवकाचा मृत्यू झाला व धार्मिक स्थळात तोडफोड करुन एका विशिष्ट समाजातील लोकांना मारहाण करण्यात आली आहे. या दंगलीत ज्या समाजकंटकांनी मारहाण केली त्या दोषींवर कठोर कारवाई करावी. पिडीतांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी दलवाई यांनी केली. त्यांनी या गावात जाऊन पिडीतांना विचारपूस केली व त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. यावेळी मुस्लिम आरक्षण फ्रंटचे अध्यक्ष अजमल खान, सुभाष लोमटे, शुकुर सालार, अन्वर राजन उपस्थित होते.
कटकट गेट येथील इकरा उर्दु शाळेतील सभागृहात मुस्लिम आरक्षणाच्या विषयावर विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. विविध क्षेत्रातील मान्यवर व हुसेन दलवाई यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आरक्षण मिळवण्यासाठी जनजागृती व मोठे आंदोलन न्यायालयीन लढाई सोबत सुरू करावे असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी अजमल खान, मोहसीन अहेमद, मुज्तबा फारुख, सुभाष लोमटे, माजी महापौर रशिद मामू, मुकीम देशमुख, मिर्झा सलिम बेग, एड सय्यद अक्रम, शेख जिया सर, इलहाजोद्दीन फारुकी आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?