स्वाभिमानी क्रिडा मंडळ आयोजित रास दांडियाची दुर्गा पूजनाने सुरुवात, पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन

 0
स्वाभिमानी क्रिडा मंडळ आयोजित रास दांडियाची दुर्गा पूजनाने सुरुवात, पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन

स्वाभिमान क्रीडा मंडळ आयोजित रास दांडियाची दुर्गा पूजनाने सुरुवात...

पारंपारिक वेशभूषेत सहभागी संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) गेली अठरा वर्ष अखंडरित्या शहरातील देवीभक्त तसेच दांडियापटूंच्या सहभागाने यशस्वीरित्या स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित एन-3 रास दांडिया प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार लोकसहभागाने साजरा करण्यात येत असुन गुरुवारी (दि. 3) घटस्थापना करून दुर्गा पुजनाने रास दांडियाची उत्साहात सुरुवात करण्यात आली.

माजी नगरसेविका माधुरी अदवंत व मिलिंद देशमुख यांच्या हस्ते गुरुजी सचिन पाठक यांनी विधिवत पूजा करून घटस्थापना केली. दुर्गा माता आरती प्रसंगी पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन जाधव, संगीता धनुरे, स्वाभिमान क्रीडा मंडळाचे उत्सव समिती अध्यक्ष समीर लोखंडे, व्यवस्थापक प्रदीप राठोड, उपाध्यक्ष निनाद खोचे, सरचिटणीस जीवन रौंदळ, सचिव विक्रांत पंजाबी, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, आरती जाधव, साजन चोरमारे यांची उपस्थिती होती.

शिवछत्रपती महाविद्यालया समोरील गरबा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या रास दांडियामध्ये सर्व दांडिया पटूननी पारंपरिक व भारतीय संस्कृतीतील वेशभूषेत सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, सचिव विशाल दाभाडे, यांनी केले आहे. 

संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड म्हणाले की, एन-3 येथे रास दांडियाचे उत्कृष्टरित्या आयोजन करण्यात येते यामुळे हा रास दांडिया मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेला आहे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जोपासत दांडियाप्रेमींसाठी या रास दांडियाचे आम्ही सातत्याने यशस्वीरित्या आयोजन करीत आहोत. त्यामुळे महिला, तरुण, तरुणींचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संदीप काळे यांची अद्ययावत ध्वनी व्यवस्था तसेच मनोज बोरा यांच्या सिध्दी डेकोरेटर्सच्या वतीने करण्यात आलेली आकर्षक स्टेज व्यवस्था, प्रदीप राठोड यांचे कायक्रम व्यवस्थापन हे या रास दांडियाचे मुख्य वैशिष्ट असून 9 दिवस या उत्सवात नियमित खेळणार्यान दांडियापटूंना, विशेष वेशभुषा, बेस्ट स्टॅमिना, बेस्ट परफॉर्मर, उत्कृष्ट दांडियापटू, बेस्ट कपलची निवड परिक्षकांद्वारे करुन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रख्यात गायकांच्या गीत संगीताच्या तालावर तरुणाईला दांडिया खेळण्याचा आनंद लुटता येणार आहे. तसेच चित्रपट, मालिका तसेच गीत संगीत क्रीडा क्षेत्रातील सेलीब्रेटीची उपस्थिती हे या नवरात्र उत्सवाचे विशेष आकर्षण राहणार आहे. नवरात्रउत्सवात पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने महिला व मुलींची विशेष सुरक्षाव्यवस्था करण्यात आली असून प्रवेशीकेद्वारे दांडियापटूंना पारंपारिक वेश भूषेतच या एन-3 रास दांडियात सहभागी होता येणार आहे. रास दांडिया खेळणाऱ्या तसेच याठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येकांसाठी खाद्य दालनांची व्यवस्था करण्यात आली असून नऊ दिवस या चालणाऱ्या पारंपारिक रास दांडियात सहभागी होऊन रास दांडिया खेळण्याचे आवाहन स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील आठ दिवस गायिका डॉ. प्रिया नरवडे, गायक प्रा. संदीप चाबुकस्वार, कुणाल वऱ्हाळे यांनी गायलेल्या आणि महेंद्र नरवडे, विजेंद्र मिमरोट, रूपक गवळी व नरेंद्र प्रधान यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतावर सर्व दांडियापटू थिरकणार आहेत.

या नवरात्र उत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रदिप राठोड,

अक्षय जगदाळे, अमरसिंह ठाकुर, गीताराम कांबळे, रऊफ पठाण, अमान पटेल, शिराज कुरेशी, गोरख राठोड, पंकज परदेशी, कृष्णा लोखंडे अनिकेत थारयानी, गिरीश बांगर,नितेश टेकाळे, प्रशांत वावरे, विशाल जाधव, हरी जाधव, नितीन शेजूळ, संग्राम अतकरे, आशिष मार्गे, अरविंद सोनवणे, संतोष नागवे, संतोष उगलमुगले, योगेश गायसमुद्रे, प्रसाद महाजन, दिनेश जायभाये, अविराज चव्हाण, विशाल काकडे, देवर्षी पगार, यश काळे, विजय काळे, राहुल पवार, सुरज हिवराळे, हे पुढाकार घेत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow