हर्सुल येथील प्रतिष्ठित व्यापारी अनिस पटेल यांची अचानक एक्झिट, आज शनिवारी रात्री 11.30 वाजता दफनविधी...

 0
हर्सुल येथील प्रतिष्ठित व्यापारी अनिस पटेल यांची अचानक एक्झिट, आज शनिवारी रात्री 11.30 वाजता दफनविधी...

हर्सुल येथील प्रतिष्ठित व्यापारी अनिस पटेल यांची अचानक एक्झिट, रात्री 11.30 वाजता दफनविधी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - हर्सुल येथून आज दुपारी मनाला चटका लावणारी दु:खद बातमी आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्लाॅटींगचे प्रतिष्ठित व्यापारी अनिस अनवर पटेल, वय अंदाजे 45 वर्षे यांचे आज शनिवारी दुपारी तीव्र ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. माजी नगरसेवक पुनमचंद बमने व अनिस पटेल यांची मैत्री सर्वश्रुत होती. 

त्यांच्या निधनानंतर दिलखुलास व्यक्तिमत्त्व व शेवटच्या श्वासापर्यंत पुनम पहेलवान यांच्या सोबत नेहमी ठामपणे उभे राहून कोणतेही काम यशस्वी करण्यासाठी धडपड करत होते. अशी भावना हर्सुल गावात व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.

त्यांची नमाज-ए-जनाजा हर्सुल ईदगाह मैदानात होईल व तेथील कब्रस्तानात दफनविधी होईल. अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन भाऊ व एक मुलगा व एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow