जालान नगर येथील पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्याने दुकानांच्या साहित्याचे नुकसान, पाणीपुरवठा विस्कळीत...!
जालान नगर येथील पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्याने नुकसान, पाणीपुरवठा विस्कळीत...!
आसपासच्या दुकानात पाणी घुसल्याने सामानाचे नुकसान...
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) मध्यरात्री 2 ते 2.10 वाजेदरम्यान शहरास पाणीपुरवठा करणारी 1400 मी.मी. व्यासाची मुख्य गुरुत्ववाहीनीची वेल्डिंग जालान नगर नजीक रेल्वे उड्डाणपूलाखाली निखळली. लाखो लिटर पाणी वाहून गेले तर काही पाणी आसपासच्या दुकानात बुटीक व अन्य दुकानात घुसल्याने साहित्याची नासधूस झाली. संपूर्ण पाईप फाटल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला.
जलवाहिनी मधील पाण्याचा उपसा करने, जलवाहिनीची दुरुस्ती इत्यादी कामे तात्काळ हाती घेण्यात आली. सदर दुरुस्तीसाठी साधारणता 24 तासांचा कालावधी लागणार आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. सदर गळती दुरुस्तीच्या कामामुळे शहराचा पाणीपुरवठा उक्त कालावधीमध्ये बंद राहणार आहे. या आकस्मिकरित्या जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरीकांना होणा-या त्रासाबद्दल महानगरपालिका दिलगिरी व्यक्त करते नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आ
हे.
What's Your Reaction?