अनुसूचित जाती आरक्षण उप वर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरवादी पक्ष संघटनांची 27 एप्रिलला भव्य मोर्चाची हाक...!

 0
अनुसूचित जाती आरक्षण उप वर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरवादी पक्ष संघटनांची 27 एप्रिलला भव्य मोर्चाची हाक...!

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरवादी पक्ष, संघटनांचा 27 एप्रिलला भव्य मोर्चाची हाक...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)- अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये 59 जात समूहाचा समावेश आहे एक जात सोडली तर अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी कोणी केली नाही परंतु राज्य सरकार जाणून बुजून उपवर्गीकरणाच्या आडून जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचे षडयंत्र रचत आहे. बदर समीतीच्या अहवालात काय म्हटले आहे जाहीर न करता उपवर्गीकरणाचा घाट घालण्यात आला यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी सर्व आंबेडकरवादी पक्ष, संघटनांच्या वतीने 27 एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार यांनी आज शनिवारी एका पत्रकार परिषदेत दिली. 

हा भव्य मोर्चा आमखास मैदान येथून सकाळी 11 वाजता निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु या निर्णयास आंबेडकरी जनतेचा तीव्र विरोध आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलनात्मक भूमिका घेण्यासाठी सुभेदारी विश्रामगृह येथे एक व्यापक बैठक पार पडली. या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार, मिलिंद दाभाडे पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना श्री.ओंकार म्हणाले न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवालच संशयास्पद आहे. अत्यल्प कालावधीत मर्यादित मनुष्यबळातून संपूर्ण महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातीचा अभ्यास करून निष्कर्ष काढणे शक्य नाही. समितीने कोणता डेटा वापरला कोणत्या जिल्ह्यांना भेट दिली. कोणत्या तज्ञांचा सल्ला घेतला हे सर्व जनतेसमोर आलेले नाही. हा अहवाल जाहीर करावा त्यावरील परिशिष्टे डेटा संदर्भ व कार्यपद्धती सार्वजनिक करावी त्यावर जनतेकडून हरकती व सूचना मागायला हव्या होत्या केवळ एका जातीच्या मागणीवरून संपूर्ण अनुसूचित जातीच्या आरक्षण संरचनेत बदल करणे योग्य नाही. मातंग समाजातील किती लोक उपवर्गीकरणाच्या बाजूने आहेत किती लोक विरोधात आहेत इतर 58 जातीची भूमिका काय आहे याचे सर्वेक्षण झाले का असा सवाल उपस्थित करून श्री ओंकार म्हणाले जर झाले नसेल तर तात्काळ राज्यव्यापी सर्वेक्षण करावे प्रथम जात निहाय जनगणना करावी त्यानंतरच निर्णय घ्यावा. सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणास परवानगी दिली असली तरी ते मनमानी नसावे असे स्पष्ट केले आहे. तसेच राज्यावर उपवर्गीकरण करण्याचे कोणतेही बंधन नाही. भक्कम डेटा ठोस पुरावे वैज्ञानिक अभ्यास आणि इतर निष्कर्षाशिवाय असा निर्णय धोकादायक आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. याशिवाय बार्टी अहवालाची शास्त्रीय पडताळणी करावी जात निहाय जनगणना करावी. सर्व 59 जातीचा स्वतंत्र अभ्यास करावा, राज्यव्यापी सार्वजनिक सुनावण्या घ्याव्या, रिक्त पदे भरावी, खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे, न्यायाधीशाच्या नियुक्तीमध्ये आरक्षण लागू करावे आदी मागण्या श्री ओंकार यांनी यावेळी केल्या‌.

यावेळी मिलिंद दाभाडे म्हणाले या मोर्चामध्ये जिल्हाभरातील सर्व आंबेडकरवादी जनता सहभागी होणार आहे. बाहेरून येणाऱ्या वाहनासाठी हमखास मैदान येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असून हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहे. मोर्चाची वेळ आणि कुठून निघणार हे नंतर जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी ॲड. रमेशभाई खंडागळे, गौतम खरात, गौतम लांडगे, कृष्णा बनकर, दौलत खरात, रमेश गायकवाड, विजय मगरे, अमित भुईंगळ, विजय वाहुळ, संतोष भिंगारे, राजू अमराव, किशोर थोरात, माणिक साळवे, चेतन कांबळे, राजू साबळे, राहुल साळवे, सतीश गायकवाड आदी उपस्थित होते. 

बैठकीला आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी... 

पत्रकार परिषदेपूर्वी शहरातील सर्व आंबेडकरवादी पक्ष, संघटनाची एक व्यापक बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक नेत्यांनी राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या आडून सरकार जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहे सरकारचा हा डाव उधळून लावू असा निर्धार बैठकीत करण्यात आला. या बैठकीला बंडू कांबळे, विजय साळवे, अनिल भिंगारे, सतीश पटेकर, सचिन निकम, मुकेश खोतकर, मिलिंद थोरे, प्रवीण जाधव, बलराज दाभाडे, बाळू वाघमारे, मुकुंद निकाळजे, विश्वजीत करंजीकर, सोनू नरवडे, कपिल बनकर, लखन दांडगे, अमोल दांडगे, विशाल इंगळे, सुमित भुईंगळ, अनिल सावंत, नाना मस्के, सचिन शिरसाठ, राहुल सोनवणे, प्रा.हनुमंत सोनकांबळे, रूपचंद गाडेकर, प्रवीण जाधव, कुणाल खरात, बालाजी सूर्यवंशी, योगेश थोरात, यशपाल दवणे, नितेश सूर्यतळे, सुनील साळवे, पंडित बोर्डे, सचिन बोर्डे, आनंद बोर्डे, अमित घनघाव, अशोक भातपुडे, डी.व्ही.खिल्लारे, बंडू कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow