हाॅटेलचे संरक्षण भिंतीचे नुकसानभरपाई मनपा आयुक्तांनी खिशातून द्यावी - डाॅ.गफ्फार कादरी

हॉटेलच्या संरक्षण भिंतीची नुकसान भरपाई मनपा आयुक्तांनी स्वतःच्या खिशातून द्यावी - डाॅ. गफ्फार कादरी
अतिक्रमण हटाव कारवाई बेकायदेशीर पध्दतीने , जी.श्रीकांत यांची खातेनिहाय चौकशी करा: जावेद कुरेशी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) -
शहरात सुरु असलेली अतिक्रमण हटावो मोहीमेला आमचा विरोध नाही परंतु भुसंपादनाची प्रक्रीया न राबवता, सेवानिवृत्त लष्करी जवान, पोलिसांचा फौजफाटा, 50 जेसीबी पोकलेन व इतर रस्त्यावर उतरवून मनपाचे आयुक्त जी.श्रीकांत मनमानी करत आहे. बेकायदेशीरपणे ते कार्यवाई करत असल्याने माझ्या मालमत्तेला बाधा पोहचल्याने दहा लाख रुपये नुकसानभरपाई त्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी. तसेच मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे त्यांची खाते निहाय्य चौकशी करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर गफार कादरी यांनी आज गुरुवार दिनांक 17 जुलै रोजी एका पत्रकार परिषदेत केली. महापालिकेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. डॉ. गफार कादरी यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेचा भांडाफोड केला ते पुढे म्हणाले गुंडागर्दी करत रेल्वेस्टेशन येथील माझ्या पत्नीच्या नावावर असलेल्या होटेल नटराज या मालमत्तेवर कोणतीही सूचना न देता 165 फुट संरक्षण भींत पाडली, 20 फुटांपर्यंत पिवर ब्लाॅक तोडले. झाडे व फ्लावर पाॅट तोडण्यात आले. 35 मीटर रस्ता आम्हाला मान्य आहे परंतु रस्त्यासाठी जमीन घेण्याची हि कोणती पध्दत आहे. दिल्लीगेट वर प्रोफेसर काॅलनी आहे. सिडकोचे लेआऊट करुन बांधकाम परवानगी घेवून बंगले बांधले. त्यांची संरक्षण भींत तोडण्यात आली. दिल्लीगेट वर तीन मजली इमारत मालकांकडून दहा लाखांचा चेक गुंठेवारी व बांधकाम नियमीत करण्यासाठी घेतले. त्यासाठी चिरीमीरी घेतली. मनपा आयुक्तांना कळायला हवे दिल्लीगेट हेरिटेज मध्ये येते येथे उंच इमारत बांधू शकत नाही मग कशाला पैसे घेतले यांचे उत्तर द्यावे. शंभर मीटर पर्यंत उंच इमारत बांधू शकत नाही त्यासाठी हेरिटेज कमिटी आहे. पालकमंत्री, लोकप्रतीनिधी काही बोलायला तयार नाही गप्प बसले. मनपात बाॅडी नसल्याने आयुक्त अधिकाराचे कर्तव्य विसरून मनमानी पध्दतीने काम करत आहे. केंद्र सरकारने 2013 मध्ये बनवलेला भुसंपादन कायद्याचे उल्लंघन ते करत आहे. गुंठेवारीच्या नावावर भ्रष्टाचार सुरु आहे. ज्यांनी शंभर टक्के गुंठेवारी भरुन बांधकाम नियमित केले त्यांना दुप्पट कर आकारला जात आहे. जी सुट गुंठेवारीत दिली त्यांचे मनपाने पैसे परत करावे. आयुक्तांनी आपल्या जलश्री बंगल्याची भींत अगोदर पाडायला पाहीजे होती. त्या बंगल्यावर आपत्कालीन निधितून सुख सुविधा करुन घेत आहे. शहरातील जनतेने भयभीत होवू नये. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनीही प्रश्न उपस्थित करावा. अनेक तक्रारी माझ्याकडे येत आहे संविधानाने आयुक्तांना जे अधिकार दिले त्याचा मनमानी करुन गैरवापर करत आहे. कोणी विरोध करायला त्यांच्यासमोर जात नाही मी पत्र लिहुन नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
नगरविकास विभाग सचिव, विभागीय आयुक्त यांना पत्र लिहुन आयुक्तांची खातेनिहाय चौकशी करुन निलंबित करावे. वेळ पडल्यास त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचा इशारा डाॅ.कादरी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
गुंठेवारीच्या नावावर नागरीकांची लूट सुरु आहे. 80 टक्के शहर विना बांधकाम परवानगीने बांधलेले आहे मग तेही पाडणार का...? गुंठेवारी भरण्यास अतिक्रमण काढण्यास आमचा विरोध नाही परंतु शहरात हुकुमशाही पध्दतीने दहशत निर्माण करुन बांधकामे पाडली जात आहे. रस्त्यांमध्ये कोणाची घरे जात असतील त्यांना सूचना देवून वेळ देत भुसंपादन प्रक्रीया अगोदर राबवा. असे बेकायदेशीरपणे, बेजबाबदारपणे कार्यवाही सुरु असल्याने ते थांबवण्यासाठी संघर्ष समीती स्थापन करुन मनपाचा घेराव करण्याचा इशारा माजी नगरसेवक जावेद कुरेशी यांनी दिला आहे.
याप्रसंगी रमजानी खान, जमील खान, अश्फाक खान, नदीम कादरी यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






