हाॅटेल तरंग बियरबारचे अतिक्रमण जमिनदोस्त, बार मालकाची अधिका-यांना अरे-रावी

 0
हाॅटेल तरंग बियरबारचे अतिक्रमण जमिनदोस्त, बार मालकाची अधिका-यांना अरे-रावी

हॉटेल तरंग बियर बार चे अतिक्रमण जमीनदोस्त...बार मालकाची अधिका-यांना अरे रावी....

औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथका मार्फत आज रोजी सिडकोतील हॉटेल तरंग बिअर बार मालक काथार यांचे जास्तीचे बांधकाम विरुद्ध मनपा अतिक्रमणची कारवाई शहरातील सिडको भागात असलेले तरंग बिअर बार यांनी 80 बाय 12 या आकाराच्या जागेत सामासिक अंतरामध्ये खुल्या जागेत विटा सिमेंट मध्ये पत्र्याचे बांधकाम केले होते.यामध्ये दहा बाय दहा चे किचन रूम तयार केले होते व उर्वरित जागेचा बिअर बार साठी वापर सुरू होता.

 याच्या बाजूलाच लगत असलेल्या खुल्या जागेत पंधरा बाय बारा चा हॉल तयार करून तेथेही बियर बार साठी वापर सुरू होता. हॉटेल तरंग बियर बार बाबत नेहमीच या भागातील नागरिक तक्रारी करत होते.

सिडको येथील साई पार्क या नावाने एन सेवन येथे प्लॉट नंबर 15 निवासीय वाणिज्य वापर साठी सिडको कार्यालयाकडून बांधकाम परवानगी घेण्यात आली होती .सदर बांधकाम परवानगी ही सिडकोच्या काळातील आहे. परंतु तरंग हॉटेलचे मालक काथार यांनी त्यांच्या जागेच्या पेक्षा जास्त बांधकाम करून अनधिकृत बांधकाम करून बियर बार सुरू केले होते. याचा त्रास त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना होत होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी आयुक्त महोदय यांची जानेवारी २०२४ मध्ये भेट घेऊन लेखी तक्रार केली होती. संबंधित तरंगचे बियर बार मालक काथार यांना वेळोवेळी नोटीस देऊन प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन समजावून सांगितले असता त्यांनी नोटीसला किंवा महानगरपालिका प्रशासनाला किंवा सिडकोला न जुमानता कोणतेही अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून घेतले नाही. उलट कारवाईला विरोध केला. अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी या हॉटेलची दोन दिवसांपूर्वी स्थळ पाहणी करून संबंधित हॉटेल चालकाला सर्व अनाधिकृत बांधकाम काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या तरी त्यांनी दखल घेतली नाही . याबाबत नागरिकांचां सतत पाठपुरावा असल्याने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सदर अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचे आज आदेश दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे हे स्वतः या कारवाई वेळी उपस्थित होते. सदर ठिकाणी आज जेसीबीच्या साह्याने सदर अतिक्रमण निष्काशित करण्याची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अतिक्रमण सविता सोनवणे यांच्या उपस्थितीत अतिक्रमन निरीक्षक सय्यद जमशेद परीक्षार्थी अतिक्रमण निरीक्षक अश्विनी कोतलकर, यशोदा पवार, सौरभ शेंडे, सिडको प्रशासनाचे अतुल बोरे , सर्वेअर मीनल खिल्लारे यांच्यासह माजी सैनिक व विद्युत विभागाचे कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow