हिनानगर येथील 30 फुट रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी

 0
हिनानगर येथील 30 फुट रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी

हिनानगर येथील 30 फुट रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) गट क्रमांक 404, चिकलठाणा हिनानगर येथील 30 फुट रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्त्याचा मोकळा श्वास करावे या मागणीचे निवेदन आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला तेथील रहीवाशांनी दिले आहे. जालनारोड ते टिपु सुलतान चौक येथे अतिक्रमण झाल्याने स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे कामाला अडथळा निर्माण होत आहे. तात्काळ हे अतिक्रमण काढावे नसता नागरीकांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. निवेदनात साजिद अफसर बेग, डॉ.अल्ताब सुलेमान पटेल, जलिल अब्दुल शेख, मिर्झा अजिज बेग, बाबुभाई इनामदार, अजमत पठाण, सय्यद उमर यांची सही आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow