हिना नगरच्या नागरीकांना रस्त्यावरुन चालताना मरणयातना भोगावे लागत आहे, प्रशासकांना भेटले रहीवाशी

 0
हिना नगरच्या नागरीकांना रस्त्यावरुन चालताना मरणयातना भोगावे लागत आहे, प्रशासकांना भेटले रहीवाशी

हिना नगरच्या नागरीकांना रस्त्यावरुन चालताना मरणयातना भोगावे लागत आहे.....

हिना नगरच्या नागरी समस्येबद्दल मनपा प्रशासकांसोबत एमआयएमच्या शिष्टमंडळाची चर्चा...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.27(डि-24 न्यूज) शहरातील चिकलठाणा परिसरातील हिना नगर आणि परिसरातील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांची एमआयएमच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी हिना नगर आणि परिसरामध्ये असलेले रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि लाईट या नागरी सुविधांच्या असलेल्या समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर पावसाळ्यात चिखल साचते आणि रहदारीस विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याचे काम सुरू करण्यात आले त्यासाठी खड्डे खोदले काम बंद असल्याने चिखल झाला असल्याने मुख्य रस्ता पार करताना नागरीकांना मरणयातना भोगावे लागत आहे. या वसाहतीकडे विशेष लक्ष मनपाने द्यावे अशी मागणी याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते जमीर अहमद कादरी, युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान, महिला शहर कार्याध्यक्ष अंकिता ताई गजहास आजमत पठाण यांनी केली हि वस्ती शहरांमध्ये असून देखील खेडेगावाप्रमाणे या वसाहतीचे हाल आहेत. येथील नागरीक मूलभूत गरजा पासून वंचित असून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण स्वतः दौरा करावा अशी विनंती प्रशासकांना करण्यात आली. वसाहतीतील समस्या लवकरात लवकर सोडवाव्या व प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी असे प्रशासकांना सांगण्यात आले. त्यानंतर आपण पाहणी करणार असल्याचे सांगून समस्या देखील सोडवण्यात येतील असे आश्वासन प्रशासक जी श्रीकांत यांनी यावेळी दिले

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow