हिशाम उस्मानी यांच्या पदयात्रेला मतदारांचा प्रतिसाद
हिशाम उस्मानी यांच्या पदयात्रेला प्रतिसाद, मध्य मध्ये मजबूत अपक्ष उमेदवार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.1(डि-24 न्यूज) औरंगाबाद मध्यचे विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे तर ते अपक्ष म्हणून या मतदारसंघात मजबूत उमेदवार मानले जात आहे
. त्यांनी शहरात पदयात्रा काढली यामध्ये मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद नामांतर विरोधी याचिकाकर्ते हिशाम उस्मानी यांची शहरात उच्चशिक्षित व नवीन चेहरा असल्याने मतदारांच्या अपेक्षा वाढले आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवसापासून शहरातील विविध भागात त्यांचा नागरीकांच्या वतीने सत्कार केला जात आहे. सिल्लेखाना, समतानगर, सईदा काॅलनी, अंबर हिल, जटवाडा रोड, कटकट गेट नेहरुनगर, बुढीलेन भागात त्यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला. शुक्रवारच्या नमाजनंतर बुढीलेन, जुना बाजार, कुतुबपुरा, सिटीचौक भागात त्यांनी पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. या पदयात्रेला मतदारांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. ऐतिहासिक औरंगाबादचे नाव परत मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. शहरातील जुनी महानगरपालिकेला औरंगाबाद महापालिका व नवीन शहरातील महानगरपालिकेला संभाजीनगर नाव द्यावे या मागणीसाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. पाणीप्रश्न, आरोग्य, शिक्षण, महीला सुरक्षा, रोजगार व शहराला नशामुक्त करण्यासाठी हा संकल्प घेऊन मतदारांसमोर आशिर्वाद घेण्यासाठी जात आहे असे त्यांनी पदयात्रेत मतदारांना सांगितले.
यावेळी फैसल खान, संजय वाघमारे , राहुल जाधव, नजीर फारुकी, मोहम्मद अश्फाक, शेख सोहेल, सय्यद सोहेल, वसिम अतार, आसिफ शेख, मोहसीन शेख, मोहम्मद इरफान, मोहम्मद एजाज, शेख शहेबाज, अजहर खान, अ.करीम, शेख अशिर, जहिर पठाण आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?