24 जानेवारीला मराठा आरक्षणावर खुली सुनावणी...!

24 जानेवारीला मराठा आरक्षणावर खुली सुनावणी - विनोद पाटील
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर क्युरेटीव पेटीशनवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बी.आर.गवई यांच्यासमोर हि खुली सुनावणी होणार आहे. याबाबत याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की मराठा समाजाला न्याय मिळेल. राज्य सरकारने आपली बाजू भक्कमपणे मांडावी याबाबत मुख्यमंत्री सोबत चर्चा केली आहे. अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.
What's Your Reaction?






