3 हजार गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप...!
3 हजार गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) दरवर्षी प्रमाणे पवित्र रमजान महीन्यात स्लम वस्तीमध्ये गरजू तीन हजार कुटुंबांना तीन टप्प्यांत सफा बैतूल मालच्या वतीने किराणा किटचे वाटप गरजू कुटुंबांचा सर्वे करून वापट करण्यात आले. या किट मध्ये कुटुबाला एक महीना किराणा सामान पुरेल एवढी अन्नधान्यसहीत वस्तू देण्यात आले आहे. आज सायंकाळी मालेगाव येथील मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती हसनैन महेफुज यांच्या हस्ते विशेष दुवा करण्यात आली. समाजातील प्रत्येक व्यक्तीने गरजूंना मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी सफा बैतूल मालचे अध्यक्ष मुफ्ती अनिसुर्रहमान, हाजी अब्दुल समद, मुफ्ती मोहम्मद, शकीब खुसरो, अयूब सेठ, समीर भाई, नवीज सेठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            