30 हजारांची लाच घेताना तहसीलदारास एसिबिने रंगेहाथ पकडले
30 हजारांची लाच घेताना तहसीलदारास एसिबिने रंगेहाथ पकडले, बदनापूर बदनापूर दि.3(डि-24 न्यूज) शेतकरी संकटात असताना त्यांचेकडून लाच घेताना तहसीलदारास एसिबिने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. 30 हजारांची लाच घेताना तहसीलदार श्रीमती सुमन उद्धवराव मोरे, वय 50, तहसील कार्यालय बदनापूर, जिल्हा जालना, आपल्या कार्यालयात लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यांचे सोबत निलेश धर्मराज गायकवाड, महसूल सहायक, तहसील कार्यालय बदनापूर यांनाही अटक केली आहे.
तक्रारदार यांचे आजोबांचे नावावरील बदनापूर शिवारातील गट क्रं.85, 86 व मौजे रामखेखा शिवारातील गट क्रं 9 मधील शेत जमीन आजोबा मयत झाल्यानंतर वारस म्हणून तक्रारदाराचे चुलते यांचे नावाने एकत्रित कुटुंबकर्ता म्हणून 7/12 वर भोगवटादार नोंद घेण्यात आली होती. तसेच तक्रारदार यांचे वडिलांसह इतर वारसांची सामाईक क्षेत्र इतर अधिकारात 6 क मध्ये वारस म्हणून नोंद घेण्यात आली होती.
त्यावरून एकत्रित कुटुंबकर्ता ही नोंद कमी करून इतर वारसांची नावे 7/12 उता-यावर नोंद करुन फेर करण्याचा आदेश काढून देण्यासाठी आलोसे क्रं.1 व 2 यांनी 30 हजारांची मागणी पंचा समक्ष केली.
सापळा रचून कार्यवाही दरम्यान यातील ओलोसे क्रं.2 यांनी पंचासमक्ष तहसील कार्यालयात लाचेची रक्कम आलोसे क्रं.1 यांचेकडे कॅबिनेटमध्ये नेवून दिल्याने त्यांना लाचेचे रकमेसह पंचासमक्ष त्यांच्या कॅबिनेटमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. त्यांचे विरोधात बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरील कार्यवाही एसिबिचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर, सापळा अधिकारी पोलिस उप अधीक्षक किरण एम बिडवे, पोलिस अंमलदार शिवाजी जमधडे, गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे यांनी केली आहे.
कोणी आपल्याला लाच मागत असेल भ्रष्टाचार संबंधित काही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक 1064, पोलिस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, औरंगाबाद, मोबाईल नंबर 9923023361, पोलिस उप अधीक्षक, जालना,
9011125553, 0240-220252
dyspacbjalana@gmail.com वर संपर्क साधावा.
What's Your Reaction?