8 किलो सोने, 40 किलो चांदीवर दरोडेखोरांचा डल्ला, वाळूज परिसरात खळबळ....!

 0
8 किलो सोने, 40 किलो चांदीवर दरोडेखोरांचा डल्ला, वाळूज परिसरात खळबळ....!

8 किलो सोने, 40 किलो चांदीवर दरोडेखोरांचा डल्ला, वाळूज परिसरात खळबळ...

पिस्तुलाचा धाक दाखवत केली लुटमार...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) 

कुटुंबियासह परदेशात राहणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाच्या घरावर दहा ते बारा चोरट्यांनी दरोडा घातल्याची घटना गुरुवार, 15 मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी व्यावसायिकाच्या बंगल्यावर असलेले सुरक्षारक्षक, वाहनचालक यांना पिस्तुलाचा धाक दाखवत घरातून तब्बल 8 किलो सोन्याचे दागिने, 40 किलोचे चांदीचे दागिने चोरुन नेले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे एमआयडीसी वाळूज परिसरात एकच खळबळ उडाली असून दुपारी उशिरापर्यंत याप्रकरणी कोणाविरुध्दही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले.

एमआयडीसी वाळूज परिसरातील बजाजनगरात संतोष राधाकिसन लड्डा यांचे घर आहे. संतोष लड्डा हे व्यावसायिक असून त्यांचा एक मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवसापूर्वी संतोष लड्डा कुटुंबिय मुलाला भेटण्यासाठी अमेरिका येथे गेले आहेत. लड्डा यांच्या बंगल्यावर सुरक्षारक्षक, बंगल्याची निगा राखणारे कर्मचारी आणि वाहनचालक होते. गुरुवारी पहाटे दोन ते चार वाजेच्या दरम्यान लड्डा यांच्या बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी सुरक्षारक्षक, बंगल्याची निगा राखणारे कर्मचारी आणि कारचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवत एका ठिकाणी डांबून ठेवले. त्यानंतर त्यांनी घरातील कपाटे फोडून कपाटातील सोने, चांदीचे दागिने रोख रक्कम असा कोट्यावधी रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग, गुन्हेशाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे आदींची पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्यात दहा ते बारा चोरटे तोंडाला रुमाल बांधून आणि हातात पिस्तुल घेवून लुटमार करीत असल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलिस करत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow