इम्तियाज जलील यांची मुंबईतून लोकसभा लढण्याची इच्छा...पलायन कशासाठी राजकीय वर्तुळात चर्चा

 0
इम्तियाज जलील यांची मुंबईतून लोकसभा लढण्याची इच्छा...पलायन कशासाठी राजकीय वर्तुळात चर्चा

इम्तियाज जलील यांची मुंबईतून लोकसभा लढण्याची इच्छा...पलायन कशासाठी राजकीय वर्तुळात चर्चा...या निर्णयामुळे पक्षातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या...

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) अचानक खासदार इम्तियाज जलील यांचे मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले मी मुंबईतून आगामी लोकसभा निवडणुकीत उडी घेण्याची इच्छा पक्षाचे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्याकडे व्यक्त केली आहे पुढील निर्णय त्यांनी घेतला तर मी तेथील नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निवडणूक हाच एक मार्ग आहे.

अंतीम निर्णय पक्षाचे अध्यक्ष यांना घ्यायचा आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुक लढण्यासाठी आमच्या पक्षांकडे अनेक उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत मागे घडलेली घटनेने वेदना झाली. मागिल 20 ते 30 वर्षांपासून दुकाने थाटून पोटाची खळगी भरणा-यांचे दुकानांवर बुलडोझर चालवून त्यांचा व्यवसाय उध्वस्त करण्यात आला. शेकडो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली तरीही एकही मुस्लिम आमदाराने प्रश्न उपस्थित केला नाही त्यांच्या पुनर्वसनासाठी पुढे आले नाही उलट सत्ताधारी पक्षातील नेते उलट सुलट वक्तव्य तेथे करत होते मग गरीबांच्या न्याय हक्कासाठी कोण लढणार, त्यांच्या पाठीशी कोण उभे राहणार म्हणून माझी इच्छा अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तेथून निवडणुकीत उभे राहावे. यश मिळेल अथवा नाही मिळेल. ईश्वराची इच्छा, येथेही 2014 विधानसभा निवडणुकीत व 2019 लोकसभा निवडणुकीत लोक म्हणत होते यश मिळणार नाही. परंतु नशिबाने साथ दिली व विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आशिर्वाद दिले व यश मिळाले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड व चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावत काय काम केले याबद्दल उत्तर देताना त्यांनी सांगितले त्यांनी समोरासमोर चर्चा करावी दुध का दुध पाणी का पाणी हो जायेंगा असे आव्हान दिले.

एकीकडे राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की 2019 लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी हा पक्ष एमआयएम सोबत असल्याचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला होता. हर्षवर्धन जाधव यांनी बरीच मते घेतल्याने मतांचे विभाजन झाले व काही हजार मतांनी ते निवडून आले. आता मात्र राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहे. एमआयएम हा एकटाच पक्ष आहे. महाविकास आघाडी एकत्र आल्याने त्याचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत भक्कमपणे तयारी सुरू आहे. राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने मुंबईत पलायन करण्याचा निर्णय घेतला असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow