ऑटोचालकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात, पोलिस आयुक्त व आरटीओंची भेट घेणार...!
ऑटोचालकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात, पोलिस आयुक्त व आरटीओंची भेट घेणार...!
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) ऑटो चालकांना अवाजवी चालानाची पावती मिळत असल्याने शहरातील ऑटो चालकांना आर्थिक भुर्दंड बसत नसल्याने ते हवालदील झाले आहे. विविध पक्ष संघटना यांनी वेळोवेळी निवेदने दिली तरीही ऑनलाईन चालान देने सुरुच आहे. एका एका ऑटो चालकांना दहा ते पंधरा हजार रुपये ऑनलाईन पावती मिळत असल्याचा ऑटो चालकांचा आरोप आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड भरणे अशक्य आहे. विना परवाना, ड्रेस, बैच, नोपार्कींग व लायसन्स अशा विविध प्रकारचे दंड वाहतूक पोलिस व आरटीओंकडून दिले जात आहे. ऑटो चालक मालकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस आयुक्त व आरटीओंची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आज दुपारी शहागंज येथे शिवसेनेचे नेते तथा माजी खा.चंद्रकांत खैरे यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी शहरातील ऑटो चालक मालक यांच्याशी संवाद साधला व अडचणी समजून घेतले. याप्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमानी, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, शहर उपाध्यक्ष मुन्नाभाई, आमेद यांच्या उपस्थितीत निवेदन देवून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी विविध ऑटो युनियनचे पदाधिकारी व ऑटोचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?