शिक्षकाच्या वारसांना 1 कोटी 5 लाख नुकसानभरपाई देण्याचे लोकन्यायालयाचे आदेश
शिक्षकाच्या वारसांना 1 कोटी 5 लाख नुकसानभरपाई देण्याचे लोकन्यायालयाचे आदेश...
राष्ट्रीय लोक अदालत मध्ये अनेकांना मिळाला न्याय.. जिल्हा सत्र न्यायालयात लोक अदालतचे आयोजन...
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) जिल्हा सत्र न्यायालयात आज राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतमध्ये अनेकांना न्याय मिळाला. सकाळपासून न्यायालयाच्या आवारात पक्षकार व वकीलांची गर्दी होती.
एका शिक्षकाचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना 1 कोटी 5 लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश लोक न्यायालयाने दिले. वारसांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी एड संतोष पी.पाथ्रीकर व एड गजानन आर.व्यवहारे यांच्या मार्फत मोटार अपघात दावा प्राधिकरणात दाखल केला होता. श्री. गोरख शिक्षण संस्था संचलित, श्री.गोरख विद्या मंदिर खामगाव येथे सहशिक्षक म्हणून नोकरी करणारे गणेश विठ्ठल काटकर यांच्या स्कुटीला दि.23 जूलै 2021 रोजी औरंगाबाद ते जळगाव महामार्गावर पाल फाट्याजवळ कारने धडक दिल्यामुळे अपघाती मृत्यू झाला होता. दि.9/9/2023 रोजीचे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मृताचे वय, मिसिक पगार, अवलंबून वारस, भविष्यातील वाढीव पगार, बढती इत्यादी बाबींचा विचार करून विमा कंपनीने वारसांना तडजोडीने नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. विमा कंपनीने जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्षा मा.श्रीमती विभा प्र.इंगळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश औरंगाबाद, जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव श्रीमती वैशाली पी.फडणीस, पैनल प्रमुख सहायक जिल्हा न्यायाधीश ए.आर.उबाळे व एस.के.वरलोटा यांच्या समोर लगेच वारसांना धनादेश सुपूर्द केला. विमा कंपनीतर्फे एड मंगेश सी.मेने व वरिष्ठ व्यवस्थापक संतोष मोरे यांनी अनमोल सहकार्य केले. मृत सहशिक्षिकांचे वारसातर्फे एड.संतोष पाथ्रीकर व एड गजानन आर.व्यवहारे यांनी काम पाहिले. सदरील प्रकरण तडजोडी आधारे निकाली निघण्यासाठी future जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ विधी अधिकारी उमाकांत शिरसाठ व उपविधी अधिकारी संतोष मोरे यांनी मोलाचे परिश्रम घेतले व कंपनीच्या वतीने एड मंगेश मेने यांनी सहकार्य केले.
What's Your Reaction?