गणेशोत्सव,ईदमिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचे पथसंचलन, केंद्रीय सुरक्षा दलाची तुकडी दाखल
पोळा-गणेशोत्सव-ईदमिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचे पथसंचलन
केंद्रीय सुरक्षा दलाची तुकडी शहरात दाखल
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) आगामी पोळा, श्री गणेश उत्सव व ईद मिलादून्नबीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दी.१२)शहरात शहर पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात केंद्रीय सुरक्षा बलाचे जवानही सहभागी झाले होते.
आगामी काळात साजरे होणारे विविध सण उत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या आदेशाने मंगळवारी शहरात पथ संंचलन करण्यात आले. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात रॅपिड अॅक्शन फोर्सची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या पथसंचलनामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सच्याजवानांनी देखील सहभाग नोंदवला. शहरातील अत्यंत संवेदनशील असलेल्या जीन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे पथसंंचलन करण्यात आले. या पतसंंचलनात शहर पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांसह रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान आणि जीन्सी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते.
या पथसंंचलनात जीन्सी पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक आम्रपाली तायडे, आर.ए.एफचे सहा कमांडर गगनदीप, निरीक्षक रविकांत, निरीक्षक एच.आर.वानखेडे आदी अधिकारी सहभागी झाले होते. त्यासोबतच दंगा नियंत्रण पथक, वज्र वाहन, पोलिसांचे महारक्षक वाहन आदी अत्याधुनिक वाहने देखील या पथ संचलनामध्ये सहभागी झाली होती.
What's Your Reaction?