आमरण उपोषण मागे घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या पाच अटी

 0
आमरण उपोषण मागे घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या पाच अटी

आमरण उपोषण मागे घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या पाच अटी

जालना, दि.12(डि-24 न्यूज) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांडे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. आमरण उपोषण मागे घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी पाच अटी ठेवल्या आहेत. अहवाल कसाही येवो मराठ्यांना 31 व्या दिवशी राज्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची हे मला आज लेखी द्यावे. महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झालेत सर्व मागे घ्यावे. जे अधिकारी दोषी आहे त्यांना निलंबित करावे. उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळ, छत्रपती संभाजी राजे, छत्रपती उदयनराजे उपस्थित हवेत, सरकार आणि मराठा समाजामध्ये दोन्ही राजे उपस्थित राहावे. मुख्यमंत्री किंवा सरकारने हे सर्व आम्हाला लेखी लिहुन द्यावे, सरकारने टाईम बाॅन्ड सांगावे या अटी उपोषण मागे घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ठेवल्या आहेत. सरकारकडून काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा ठराव अर्जून खोतकर व मंत्री संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटलांना दिला आहे. त्यानंतर त्यांनी आपली भुमिका मांडली. त्यांनी सांगितले सरकार झुकले, पहिल्यांदाच सर्वपक्षीय बैठक घेतली. आरक्षणाचे पत्र हातात पडेपर्यंत आंदोलन थांबणार नाही. सरकारने एक महीन्याचा वेळ मागितला आम्ही ते देऊ. आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली तरीही आंदोलन सुरू राहणार. मी जागा सोडणार नाही. असे त्यांनी जाहीर केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow